Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रतन टाटा यांना सर्वधर्मीय गुरुंकडून श्रद्धांजली अर्पण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, लोक म्हणाले...

Ratan Tata : टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते आणि त्यांना वयोमानानुसार आजार होत होता.

दरम्यान, आज सकाळपासून रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील लोकांनी गर्दी केली आहे. त्याचबरोबर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वधर्मीय अर्थात ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, शीख यासह विविध पंथातील धर्मगुरुंनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो म्हणून देवाकडे प्रार्थना केली. दरम्यान, श्रद्धांजली अर्पण करतानाचा सर्वधर्मीय गुरुंचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांकडून त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. लोक म्हणाले, राष्ट्रासाठी लढणाऱ्या या व्यक्तीला सलाम.

RATAN TATA

सर्वधर्मीयांनी दिला टाटांच्या पार्थिवाला खांदा

रतन टाटा यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी पारशी, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि हिंदू धर्मगुरूंचा सहभाग होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. देशाचा खरा सुपुत्र, देशप्रेमी, सर्वधर्मसमभावाचे प्रतिक, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

काय म्हणाले लोक...!

रतन टाटा प्रार्थना सभेत सर्व विविध धर्माच्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीवर लोकांनी कशी प्रतिक्रिया दिली ते येथे आहे. लोक म्हणाले की, अतिशय चांगले व्यक्तिमत्व, मानवता हे त्या धर्माचे नाव आहे. ज्याचा प्रत्येक धर्मातील लोक आदर करतात. आम्ही एक रत्न गमावले आहे. देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. महान व्यक्तीला मनापासून अभिवादन.

हर्ष गोयंकांनी दिली माहिती

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सर्वप्रथम त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. रात्री 11:24 वाजता त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, 'घड्याळाची टिक टिक थांबली आहे. टायटन्स आता नाहीत. रतन टाटा हे प्रामाणिकपणा, नैतिक नेतृत्व आणि परोपकाराचे प्रतीक होते.'

चारपर्यंत दर्शन घेता येणार

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह रुग्णालयातून त्यांच्या घरी नेण्यात आला. टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात ठेवण्यात येणार आहे. येथे लोकांना त्यांचे शेवटचे दर्शन घेता येणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+