प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्याबाबत हा नवीन खुलासा! इतक्या वेळा दिली 'युपीएससी'
मुंबई - प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या UPSC मधील गैरप्रकार प्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. विशेषतः त्यांचे प्रशिक्षण आठवडाभर थांबवले आहे. पूजा 15 ते 19 जुलै या कालावधीत आदिवासी विकास प्रकल्पात इंटर्न म्हणून रुजू होणार होत्या, मात्र वाशिमच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी याला स्थगिती दिली आहे.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकर यांची युपीएससी परीक्षा देतानाच्या अनेक गोष्टीही पुढे आल्या आहेत. एकएक गुंता सोडवण्याचा प्रयत्न होत असतानाच गुंता आणखीनच वाढला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आता नवीन एक खुलासा पुढे आला आहे.

वय, नाव बदलून दिली 'युपीएससी'
चौकशीत असे समोर आले आहे की, पूजा खेडकर यांनी त्यांचे नाव आणि वय बदलून यूपीएससी देण्यासाठीची मुदत वाढवली होते. 2020 आणि 2023 साठी पूजा यांनी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल (CAT) मध्ये दाखल केलेल्या दोन अर्जांमध्ये पूजाची वेगवेगळी नावे आहेत.
ही दोन वेगवेगळी नावे लावली
2020 च्या अर्जात पूजा खेडकर यांनी त्यांचे नाव 'खेडकर पूजा दिलीपराव' आणि वय 30 वर्षे नमूद केले होते. तर, 2023 मध्ये त्यांच्या कॅटच्या अर्जात 'पूजा मनोरमा दिलीप खेडकर' हे नाव आणि वय 31 वर्षे नमूद केले होते. तीन वर्षांच्या कालावधीत त्यांचे वय केवळ एक वर्षाने कसे वाढू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
11 वेळा युपीएससी दिली
वास्तविक, UPSC मध्ये, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 32 वर्षे वयापर्यंत 6 वेळा परीक्षा देण्याची परवानगी आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवार 35 वर्षे वयापर्यंत 9 वेळा परीक्षेला बसू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांनी एकूण 11 वेळा नागरी सेवा परीक्षा दिली आहे.
हा आहे आरोप
भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होण्यासाठी पूजा यांनी अपंगत्व आणि OBC आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा वाद वाढल्यानंतर त्यांची पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली. पूजा यांच्या अपंग आणि ओबीसी प्रमाणपत्राची पोलिस चौकशी होणार आहे. प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी केली जाईल.
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 2 अर्ज
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी दोनदा अर्ज केला होता. पुण्याच्या औंध रुग्णालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. औंध हॉस्पिटलने पूजा यांच्या अर्जाला उत्तर देताना सांगितले की, 'तुम्ही 23 ऑगस्ट 2022 रोजी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. 11 ऑक्टोबर 2022 रोजी तुम्ही नमूद केलेल्या लोकोमोटर अपंगत्वाची वैद्यकीय पथकाने तपासणी केली होती. अहवालाच्या आधारे तुमचा दावा न्याय्य असल्याचे संघाने मानले नाही.
2 आठवड्यात अहवाल होणार सादर
11 जुलै रोजी वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी केंद्राने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. केंद्राने एका निवेदनात म्हटले आहे की, हा तपास अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केला जात आहे.
2023 च्या बॅचचे अधिकारी खेडकर यांच्या उमेदवारीचे दावे आणि इतर तपशीलांची पडताळणी करणे हा त्याचा उद्देश असेल. ही समिती दोन आठवड्यात अहवाल सादर करणार आहे.












Click it and Unblock the Notifications