कोण आहेत सुहास दिवसे? ज्यांच्यामुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्या आयुष्यात आले वादळ!
मुंबई - प्रशिक्षणादरम्यान ऑडी कार, केबिन आणि इतर व्हीआयपी सुविधांची मागणीवरुन प्रसिद्धी झोतात आलेल्या आणि नंतर तितक्याच वादग्रस्त ठरलेल्या पुण्यातील आयएएस पूजा खेडकरबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांच्या शासकीय सेवेतच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही भूकंप आला आहे.
सुहास दिवसे कोण?
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांना कसा त्रास झाला, युपीएससी, नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय उठाठेव केली? हे आयएएस अधिकारी सुहास दिवसे यांच्यामुळे उघड झाले. या सर्व प्रकरणाची पोलखोल आयएएस अधिकारी सुहास दिवसे यांच्यामुळे झाली. ते सुहास दिवसे कोण आहेत चला जाणून घे़ऊया.

सुहास दिवसेंनी भुषवली ही पदे
2009 पासून महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी सुहास दिवसे यांनी यापूर्वी कृषी आयुक्तपद भूषवले होते आणि नंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते. त्यांनी भंडाराचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे आणि पिंपरी चिंचवड न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रमुख पद भूषवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुहास दिवसे यांचे जवळचे संबंध असल्याचे मानले जाते.
मुख्य सचिवांना पत्र
सुहास दिवस हे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत. 2023 ची आयएएस पूजा खेडकर ही पुण्यात सुहास दिवसे यांच्या अंतर्गत परिविक्षाधिन आयएएस म्हणून कार्यरत होती. पूजा खेडकर 3 जून रोजी रुजू होण्याआधीच स्वतंत्र केबिन, लाल दिवा असलेली ऑडी कार आणि कर्मचारी यांच्या कथित अवास्तव मागण्या करत आहेत असे पत्र पुण्याचे डीएम सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहले होते.

पुजा खेडकर यांची वाशीमला बदली
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे पत्र प्राप्त होताच एकनाथ शिंदे सरकारने प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर तत्काळ कारवाई केली. त्यांची पुण्याहून वाशीम येथे बदली केली. पूजा खेडकर यांची वाशिम येथे सहायक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पूजा खेडकरची बदली होताच त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या यासोबतच त्यांचा युपीएससीचा प्रवास, कथित बनावट प्रमाणपत्रे आणि एकूण संपत्ती याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.












Click it and Unblock the Notifications