आयएएस पूजा खेडकर यांना 7 टक्के अपंगत्व! 'शुूद्ध फसवणूक' जो पत्ता दिला तिथेही कारखाना!
मुंबई - प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अपंगत्व प्रमाणपत्र समोर आले आहे. त्यानुसार त्यांना ७ टक्के अपंगत्व आहे, विशेष म्हणजे अपंग संवर्गातून शासकीय अधिकारीपदी निवड होण्यासाठी ४० टक्के अपंगत्व आवश्यक असते. त्यामुळे आता हा मुद्दाही गाजणार असून पुजा खेडकर यांच्या अडचणी अधिक वाढणार असल्याचे बोलले जाते.
प्रमाणपत्र पुणे येथून जारी
युपीएससी निवडीचा वाद वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांना 24 ऑगस्ट 2022 रोजी यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालय, पुणे येथून अपंगत्वाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले. या प्रमाणपत्रात त्या 7 टक्के अपंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

काय आहे युपीएससीचा नियम
यूपीएससीच्या नियमांनुसार, अपंग कोट्यातील निवडीसाठी 40 टक्के अपंगत्व असणे आवश्यक आहे. पण वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, 7 टक्के अपंगत्व म्हणजे शरीरात कोणतेही मोठे अपंगत्व नाही. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या अपंग आयुक्त कार्यालयाने पोलिसांना दिले आहेत.
जो पत्ता दिला तिथे कारखाना!
अपंगत्व प्रमाणपत्रात पूजा खेडकर यांचा पत्ता 'प्लॉट नं. 53, देहू आळंदी रोड, तळवडे, पिंपरी चिंचवड, पुणे' असा लिहिला होता. तर या पत्त्यावर घर नसून थर्मोव्हर्टा इंजिनिअरिंग कंपनी नावाचा कारखाना आहे. जप्त करण्यात आलेली पूजाची ऑडी या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती.
अपंग कोट्यातून निवड
सरकारी नियमांनुसार, अपंगत्व प्रमाणपत्रासाठी आधार कार्डची गरज आहे. परंतु पूजाच्या प्रमाणपत्रात रेशन कार्डचा समावेश होता. अपंग कोट्यातून यूपीएससीमध्ये निवड झाल्यानंतर पूजाची अनेक अपंगत्व प्रमाणपत्रे बाहेर आली आहेत. पूजा खेडकर यांनी 2018 आणि 2021 मध्ये अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाचे युपीएससीला दिलेले 2 अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले होते.
नाव अन् वयात बदल!
पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी नाव आणि वयातही बदल केला आहे. युपीएससीमधील अनियमिततेप्रकरणी आणखी काही खुलासे समोर आले आहेत. यूपीएससीचा प्रयत्न वाढवण्यासाठी पूजाने तिचे नाव आणि वय बदलल्याचे समोर आले आहे. 2020 आणि 2023 साठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण कॅटमध्ये तिने दाखल केलेल्या 2020 च्या अर्जात 'खेडकर पूजा दिलीपराव' आणि वय 30 वर्षे नमूद केले होते. तर, 2023 मध्ये कॅटच्या अर्जात नाव 'पूजा मनोरमा दिलीप खेडकर' आणि वय 31 वर्षे नमूद केले होते.
11 वेळा दिली परीक्षा
युपीएससीच्या नियमानुसार युपीएससी परीक्षेत सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 32 वर्षे वयापर्यंत 6 वेळा परीक्षा देण्याची परवानगी आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवार 35 वर्षे वयापर्यंत 9 वेळा परीक्षेला बसू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाने एकूण 11 वेळा नागरी सेवा परीक्षा दिली आहे हे विशेष!
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications