मोठी बातमी : टोयोटा किर्लोस्कर प्रकल्पातून 16 हजार नवीन नोकऱ्या मिळणार! सामंजस्य करारावर स्वाक्षरी

मुंबई : मराठवाड्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर प्रकल्प येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

आज सह्याद्री अतिथीगृहात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Toyota Kirloskar Maharashtra Govt signs agreement Eknath Shinde News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच शिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल.

..यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे. एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा आदि उपस्थित होते.

इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन

छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. यासाठी 20 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे 8 हजार थेट आणि अप्रत्यक्ष 8 हजार अशी 16 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला 4 लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे,

प्रकल्पांची माहिती

जेएसडब्ल्यु एनर्जी पीएसपी इलेव्हन लि. यांचा लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्पासाठी गुंतवणुक

हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. 5000 पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी लि. कंपनी इलेक्ट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 27 हजार 200 कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, 5200 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामध्ये वार्षिक 5 लाख इलेक्ट्रीक प्रवासी कार व 1 लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे.

  • हिंदूस्थान कोका कोला बेव्हरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा विशाल प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. 1500 कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.

  • आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प तळोजा/पनवेल, जि. रायगड/पुणे/उर्वरीत महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्रातील पहिलाच सेमीकंडक्टर प्रकल्प

    महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमीकंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प आहे. याप्रकल्पामध्ये प्रथम टप्यात रूपये 12 हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार. 4000 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. दुसऱ्या टप्यामध्ये एवढीच गुंतवणूक होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होणार आहे.

    आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरी जि. नागपूर आणि एमआयडीसी भोकरपाडा, ता. पनवेल जि. रायगड या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण 13 हजार 647 कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, याद्वारे 8000 पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

    परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर येथे स्थापन करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पामध्ये रू. 1785 कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+