मोठी बातमी: संपूर्ण विदर्भ, कोकण, सातारा, पुणे जिल्ह्यात येलो अलर्ट, 'राधानगरी' सातही दरवाजे उघडले

कोल्हापुरात महापुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान पाऊसही कमी झाला होता. पण बुधवारी पहाटेपासून पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. धरण क्षेत्रात मंगळवारी संततधार सुरू होती. परिणामी राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून धरणातून 10 हजार क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.

तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस

तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी धरण सांडव्यावरून आज सकाळी 10 वाजता 1500 cusec ने सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून 2000 cusec इतका विसर्ग करण्यात येणार आहे.

Maharashtra Weather Yellow alert for rain in Konkan  Vidarbha  Pune  Satara  Thane districts

आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

कृष्णेच्या आयर्विन पूल येथे पाणी पातळीत अंदाजे 2 फुट वाढ होणार

सांगली जिल्ह्यात सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आणि मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना आणि इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे 1 त 2 फुट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोयना धरणामधून 42 हजार 100, धोम धरणातून 453, कन्हेर धरणातून 4 हजार 622, उरमोडी धरणातून 500, तारळी धरणातून 3 हजार 526 व वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग झाला. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल तसेच अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

आज येथे पावसाची शक्यता

  • हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
  • आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तीन, चार तासांत कोकण प्रदेश, रायगड आणि घाट भागात मध्यम सरींची शक्यता आहे.
  • सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे,पुणे जिल्ह्यात आजही पुन्हा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
  • संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+