मोठी बातमी..! पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाँम्बने उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिसांची पळापळ
Threat to Prime Minister Narendra Modi- काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या घटना आता वारंवार घडू लागल्या आहेत. आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा संदेश मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सॲप नंबरवर आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा धमकीचा संदेश मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.

ट्रॅफिक हेल्पलाईनवर आला मॅसेज
मुंबई पोलिसांची आज चांगलीच धावपळ उडाली. मुंबई पोलिसांना त्यांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सॲप नंबरवर पंतप्रधान मोदी यांना मारण्याच्या धमकीचा मॅसेज आला. विशेष म्हणजे त्यात आयएसआय एजंटच्या नावाचा समावेश असल्याने पोलिसांनी एफआयआर नोंदवला. तातडीने तपास सुरु केला. त्यानंतर हा मॅसेज राजस्थान येथील अजमेरमधून आल्याची माहिती मिळाली. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
बाँम्बहल्ला करण्याचा होता उल्लेख
या वृत्तात हा संदेश काय होता, याबाबत एका अधिकाऱ्याचे स्टेटमेंटही देण्यात आले आहे. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यांनुसार हेल्पलाइनवर आलेल्या संदेशात दोन आयएसआय एजंटचा सहभाग आणि मोदींवर बॉम्ब हल्ला करण्याचा कट रचल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, यापूर्वीही पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता अशीच धमकी आल्यानंतर पोलीस अलर्ट झाले असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
वारंवार येत आहेत मॅसेज
पंतप्रधान मोदींना धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत. काही लोक दारूच्या नशेत किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असल्याने असे धमकीचे संदेश पाठवतात, असे यापूर्वीच्या तपासात आढळले आहे. मुंबई पोलिसांना मिळालेले बहुतांश धमकीचे संदेश हे त्यांच्या ट्रॅफिक पोलीस हेल्पलाइन व्हाट्सअँपवर येतात. यावेळी आलेला संदेशही मानसिक रुग्ण किंवा दारुच्या नशेच पाठवविला असावा, असे प्रथमदर्शनी दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications