थर्टी फस्टला बसणार खिशाला फटका; दारु महागणार, पहा नेमंकं काय घडलंय

सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातील मुल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे सरकारला क्लबमधील खरेदीवर कर आकारता येणार आहे. त्याचा थेट परिणाम दारु व क्लबमधील खाद्यपदार्थांवर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या थर्टी फस्टला मद्य शौकिनांच्या खिशाला झळ बसणार आहे.

Liquor Expensive

मुल्यवर्धिक कर विधेयक मंजूर

विधान परिषदेत शुक्रवारी महाराष्ट्र मुल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यामुळे आता क्लबमधील वस्तू महागणार आहेत. या वस्तूंवर जीएसटी व मुल्यवर्धित कर अशा दोन्ही प्रकारचे कर भरावे लागणार आहेत. यामुळे राज्याच्या तिजोरीत कर जमा होणार असला तरी, ग्राहकांच्या खिशालाही झळ बसणार आहे.

दोन करांचा बोजा

विधेयक मंजूर झाल्याने राज्यातील क्लबमध्ये दारू आणि खाद्यपदार्थ महागणार आहेत. क्लबमध्ये खरेदी केलेल्या वस्तूंवर जीएसटी आणि मूल्यवर्धित कर अशा दोन्ही प्रकारचे कर भरावे लागणार आहेत. गेल्यावर्षी जीएसटीच्या रुपाने राज्याच्या तिजोरीत अडीच लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाल्याची महिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पॅग महागणार

आतापर्यंत क्लबमधील मद्याच्या पेगवर व्हॅट आकारला जात नव्हता. बाहेरच्या हॉटेलमधील दारू महाग, तर क्लबमधील दारू स्वस्त असा प्रकार होता. आता कोणत्याही बारप्रमाणेच क्लबच्या पेगमवरही 10 टक्के व्हॅट द्यावा लागेल. इतर हॉटेलप्रमाणेच क्लबमधील खाद्यपदार्थावर देखील 5, 12 आणि 18 टक्के या दराने जीएसटी मोजावा लागेल.

थर्टी फस्ट महागणार

थर्टी फस्टला अनेकजण हाँटेलमध्ये किंवा बारमध्ये जाण्याचे नियोजन करत असतात. यावर्षीही असे नियोजन अनेकांनी केले होते. मात्र आता क्लबवरील दारुही महागल्यामुळे मद्यपींच्या किंवा आंबटशौकिनांच्या खिशाला झळ बसणार आहे. थर्टी फस्टचे नियोजन यामुळे महागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+