मध्यरात्री मुंबई हदरली, राष्ट्रवादीच्या 'त्या' मोठ्या नेत्याची हत्या, सपासप वार करुन हल्लेखोर पसार

राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास मुंबईत भायखळा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. काही जणांनी त्यांच्यावर हल्ला करून धारदार शस्त्राने वार करून ही हत्या केली. हल्ल्यानंतर कुर्मी यांना तातडीने दवाखान्यात नेले असता, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे भायखळा परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना भायखळा येथील म्हाडा कॉलनीच्या मागे शुक्रवारी रात्री १२ च्या आसपास घडली. या हल्ल्यात सचिन कुर्मी हे गंभीर जखमी झाले होते.

Sachin Kurmi

नेमकी काय घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १२ वाजता सचिन कुर्मी हे भायखळा येथील म्हाडा कॉलनी येथे गेले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी सचिन कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात कुर्मी हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा कुर्मी ही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना पोलिसांनी तातडीने त्यांच्या गाडीतून जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच कुर्मी यांचा मृत्यू झाला होता.

हत्येचे कारण अस्पष्ट

सचिन कुर्मी हे अजित पवार गटाचे भायखळा तालुकाध्यक्ष होते. त्यांची हत्या का करण्यात आली, याचे कारण समजू शकले नाही. मात्र, आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी असा संशय आले. कुर्मी यांच्या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही.

समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते

समीर कुर्मी ही समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यांच्या हत्येमुळे भुजबळ कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, समीर भुजबळ हे आज कुर्मी कुंटूबांची भेट घेणार आहेत. हत्येची माहिती मिळताच भुजबळ हे मुंबईला रवाना झाले आहेत. दरम्यान, हा हल्ला करणारे कोण होते, हा हल्ला का करण्यात आला याबाबत पोलिसांचा तपास सुरु असून लवकरच याबाबत महिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+