मोठी बातमी! उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू, महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना
Death of Balasaheb Shinde- बीड जिल्ह्यातील मतदानाच्या दिवशी चांगलाच चर्चेत आला. एकीकडे राड्याची चर्चा सुरु असतानाच, आता बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. मतदान पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्याने ही लढत रद्द होते का, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

मृत शिंदे होते अपक्ष उमेदवार
बीड विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत होते. आज मतदानाच्या दिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् ते खाली पडले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बीडमध्ये आहे चौरंगी लढत
बीड विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. या निवडणुकीत दोन अपक्षांनीही अर्ज भरल्याने ही निवडणुकीत रंगत आहे. महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली, तर महायुतीकडून योगेश क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांखेरीज मनोज जरांगे पाटील समर्थक अशी ओळख असलेल्या अनिल जगताप हेही निवडणूक लढवत आहेत. मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याही अपक्ष उमेदवार आहेत.












Click it and Unblock the Notifications