विरारमध्ये राडा! विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप; विरोधकांनी तावडेंना घेरलं, नंतर...
Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सोमवारी संध्याकाळी सहा वाजता थंडावला. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होत असून बुधवारी (दि.20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. तत्पूर्वी विरारमध्ये जोरदार राडा पाहिला मिळाला. या ठिकाणी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

विरारमध्ये नेमके काय झाले
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये विरारमध्ये राडा झाला. विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विनोद तावडे यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच, विरारच्या हॉटेलमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
व्हिडीओ झाला व्हायरल
विरार पूर्वच्या एका हाँटेलमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे पैशांची बँग घेऊन गेल्याची आणि तेथे पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. बाचाबाचीही झाली. या व्हिडीओत पाकीट दिसत आहे. मात्र ते पैशाचं आहे की, अन्य कशाचा हा उलगडा होत नाही.
विनोद तावडेंनी आरोप फेटाळले
विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर विरोधी बहुजन विकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली. या हाँटेलमध्ये बराच वेळ गोंधळ झाला. मात्र नंतर विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले.












Click it and Unblock the Notifications