Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र: 4 महिन्यांत ही कितवी भेट; वाचा मनोमिलनाची संपूर्ण कहाणी!

Thackeray Bhaubeej 2025 : आगामी मुंबई महापालिका (BMC) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. कारण, गेल्या चार महिन्यांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक जवळीक लक्षणीयरीत्या वाढली आहे.

या मनोमिलनाचा आणखी एक अध्याय आज, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी भाऊबीज (Bhaubeej) सणानिमित्ताने पाहायला मिळाला. ठाकरे बंधू त्यांच्या चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीजेसाठी एकत्र आले, ज्यामुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा स्नेहभोजनासाठी एकत्र आलं.

या भेटीमुळे, गेल्या चार महिन्यांतील राज आणि उद्धव ठाकरे यांची ही दहावी भेट ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबे एकत्र आली होती. आता भाऊबीजेच्या निमित्ताने कुटुंबातील स्नेहबंध महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिला आहे. त्यामुळे, ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार, याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.

Thackeray Bhaubeej 2025

आदित्य-तेजसही एकत्र; युतीची चर्चा अंतिम टप्प्यात

आज भाऊबीजेच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांची पुढची पिढी-आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे-हे देखील एकत्र आले होते. कुटुंबातील ही वारंवार होणारी भेट केवळ वैयक्तिक नाही, तर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर, या गाठीभेटीमुळे ठाकरे बंधूंची राजकीय युती जवळपास निश्चित मानली जात आहे.

Thackeray Bhaubeej 2025

या भेटींवर राजकीय वर्तुळातून मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक विरोधकांनी या भेटींवर टीका करत 'राजकीय सोयीसाठी मनोमिलन' असे म्हटले आहे, तर काही राजकीय विश्लेषकांनी 'दोन बंधू एकत्र येत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे,' अशी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, युती झाली तरी मुंबई महापालिका भाजप महायुतीच जिंकेल, असा विश्वास विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे.

Thackeray Bhaubeej 2025

भेटीचे कारण आणि ठिकाण राजकीय/कौटुंबिक महत्त्व

  • ५ जुलै २०२५ मराठी भाषेच्या मेळाव्यात एकाच मंचावर अनेक वर्षांनंतर प्रथमच जाहीरपणे एकत्र.
  • २७ जुलै २०२५ उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर दाखल. जवळीक वाढल्यानंतर राज यांनी थेट 'मातोश्री'वर भेट दिली.
  • २७ ऑगस्ट २०२५ उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गेले. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे 'शिवतीर्था'वर, ऐतिहासिक क्षण.
  • १० सप्टेंबर २०२५ उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी. राजकीय चर्चांना बळ देणारी महत्त्वाची भेट.
  • ५ ऑक्टोबर २०२५ (भाग १) खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला एकत्र उपस्थित. सार्वजनिक सोहळ्यात दोन्ही कुटुंबाचे एकत्र येणे.
  • ५ ऑक्टोबर २०२५ (भाग २) नामकरण सोहळा संपल्यानंतर राज ठाकरे 'मातोश्री'वर पोहोचले. कार्यक्रमाच्या दिवशी पुन्हा वैयक्तिक भेट.
  • १२ ऑक्टोबर २०२५ राज ठाकरे सहकुटुंब 'मातोश्री'वर स्नेहभोजनासाठी गेले. वैयक्तिक संबंध अधिक दृढ झाल्याचे संकेत.
  • १७ ऑक्टोबर २०२५ मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र. मनसेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची उपस्थिती, युतीची नांदी मानली गेली.
  • २२ ऑक्टोबर २०२५ राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट दिली. कौटुंबिक संबंधातील ओलावा कायम.
  • २३ ऑक्टोबर २०२५ भाऊबीज सणानिमित्त ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र. ४ महिन्यांतील १० वी भेट, युतीची अंतिम तयारी.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून, कौटुंबिक पातळीवर दोन्ही बंधूंनी दाखवलेली ही जवळीक अत्यंत महत्त्वाची आहे. आता भावनिक मनोमिलन पूर्ण झाल्यानंतर, केवळ राजकीय युतीच्या औपचारिक घोषणेची महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+