अधिवेशनाला थांबले नाहीत, राज्यसभेवर जाणार नाहीत... छगन भुजबळ अजितदादांना सोडणार?
मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी आज आपल्या मनातील खदखद काही प्रमाणात बोलून दाखवली. जहा नही चैना वहा नही रहना... म्हणत भुजबळांनी आपल्या मनातील घालमेल बोलून दाखवली. हे अपेक्षित नव्हतं, असं म्हणत भुजबळांनी अधिवेशन सोडून थेट नाशिकची वाट धरणार असल्याचं सांगितलं. शिवाय आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, असंही सांगितल्याने भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार का, या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

भुजबळ नाशिकला जाणार
रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज होते. आज प्रसारमाध्यमांनी त्यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या बोलण्यातून ते आता अजित पवारांची साथ सोडतील या चर्चाही सुरु झाल्या. भुजबळांनी आता नागपूर अधिवेशनात न थांबण्याचा निर्णय घेतला असून ते आता नाशिकला जाणार आहेत. तेथे कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले भुजबळ?
अधिवेशनाला थांबणार नाहीत का? आता तुमची भूमिका काय? असे प्रश्न पत्रकारांनी भुजबळांना विचारले. त्यावर उत्तर देताना जहा नही चैना वहा नही रहेना... असं म्हणत त्यांनी अजित पवारांची साथ सोडण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, मंत्रिपदासाठी माझ्या नावाची चर्चा होती. पण ऐनवेळी माझं नाव का काढलं मला माहित नाही. सात-आठ दिवसांपासून मला राज्यसभेवर जाण्याची ऑफर देण्यात येत आहे. पण मी हा प्रस्ताव नाकारला होता. मला राज्यसभेवर जायचे नाही. मी आत्ताच निवडून आलोय. मला लगेच राज्यसभेवर जायचं नव्हतं. मी राजीनामा दिला तर ती माझ्या मतदारांशी प्रतारणा होईल. त्यामुळे मी आता नाशिकला जाणार आहे. तेथे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. तेथून काय निर्णय घ्यायचा तो घेऊ.
अजित पवारांची साथ सोडणार?
जहां नहीं चैना वहां नहीं... असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, मला त्यांनी बक्षिस दिलं आहे. कसलं बक्षिस दिलं हे माहीत नाही. पण तुम्ही विचारता त्यावर मी एका एका वाक्यात बोलत आहे. जे काही होईल ते अपेक्षित नव्हतं. मला वाटलंही नव्हतं. पण ठिक आहे. मी त्यांचा राज्यसभेचा प्रस्ताव नाकारला आहे. आता मी थेट नाशिकला जाणार आहे. माझ्या लोकांशी चर्चा करणार आहे. तेथे काय निर्णय होईल ते सांगू.












Click it and Unblock the Notifications