ब्रेकींग ! स्वारगेट बसस्थानकातील गाड्यांमध्ये सापडले कंडोम, चादरी; वसंत मोरेंनी कार्यालयच फोडले
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तातडीने बसस्थानकात जात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला. बंद असलेल्या बसमध्ये कंडोम, साड्या, चादरी असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. चार जुन्या बसगाड्यांमध्ये लाँजिंग सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर संतप्त झालेल्या वसंत मोरे यांच्यासह शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानकाची मोडतोड केली.

नेमकं काय झालं?
स्वारगेट बसस्थानकात आज पहाटे एक २६ वर्षीय तरुणी बसची वाट पाहत होती. तेव्हा आरोपी तिच्याजवळ आला. कुठे जायचंय ताई? असा प्रश्न त्याने विचारला. तरुणीने फलटणला असं सांगितल्यावर आरोपीने साताऱ्याची बस येथे नाही, तर दुसरीकडे लागली असं सांगून तिला दुसरीकडे नेले. तिथे अंधार असल्याने तरुणीला शंका आली. तेव्हा आरोपीने टाँर्च लावून आत चढायला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली असता आरोपीने बसचा दरवाजा बंद करुन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तरुणीने तिच्या मित्राला फोनवरुन हा प्रकार सांगितला. त्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
वसंत मोरेंनी केला पर्दाफाश
हा प्रकार सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडला. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी बुधवारी दुपारच्या वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह एसटी बसस्थानक गाठलं. त्यांनी स्वारगेट परिसरातील बसस्थानकाची पाहणी केली. या पाहणीत बंद असलेल्या बसमध्ये कंडोम, साड्या, चादरी आढळून आल्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश केला. पुण्याच्या 4 जुन्या बसमध्ये लॉजिंग सुरू असल्याचा आरोपही, वसंत मोरे यांनी केला.
काय म्हणाले वसंत मोरे
वसंत मोरे म्हणाले, एसटीचं लॉजिंग सुरू आहे. चादरी, साड्या, कंडोमची पाकिट पडलेली आहेत. रोज येथे 100 कंडोम पडलेले असतात. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थित रोज इथे बलात्कार होत आहे. बाकीच्या गोष्टी येथे सुरू आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोर हा प्रकार घडत आहेत. राजरोसपणे हा प्रकार घडत आहे. आगारप्रमुख आणि सुरक्षारक्षकांचे निलंबन झाले आहे. चार गाड्या येथे उभ्या आहेत. स्क्रॅपला पाठवायच्या गाड्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत.
बसस्थानकाची तोडफोड
या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट आगारातील कार्यालयाची तोडफोड केली. बस स्थानकावर शेकडो कंडोम्स पडलेत म्हणजे इथे रोज बलात्कार होत असतील, असं वसंत मोरेंनी म्हटलंय.












Click it and Unblock the Notifications