अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद नवाब मलिकांच्या मुलीविरुद्ध लढणार; NCP Vs NCP सामना रंगणार!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने राज्यात सर्वत्र धामधूम सुरू झालेली आहे. सर्वच पक्षांकडून तिकीट वाटप होऊ लागले आहे. रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. यात सर्वांना उत्सुकता लागलेल्या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून ट्विस्ट देत पवारांनी नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.
अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढाई होणार आहे. अर्थात माजी मंत्री तथा अजित पवार गटातील नेते नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्याविरुद्ध प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद खान यांना तिकीट मिळाल्याने या ठिकाणची लढत चुरशीची होणार आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची उत्सुकता वाढत आहे. शरद गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले की, अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना अजित गटाच्या उमेदवार सना मलिक यांच्या विरोधात अणुशक्ती नगर मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे.
फहाद अहमद काय म्हणाले?
फहाद अहमद यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही लोकशाही आहे, येथे घराणेशाही चालणार नाही. नवाब मलिक यांनी मतदारसंघात काम केलेले नाही. त्यांची मुलगी सना मलिक यांनी त्यांच्या नावावर निवडणूक लढवावी. मी 29 ऑक्टोबरला कन्हैया कुमार, स्वरा भास्कर आणि इतर माझे सहकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहोत.
फहाद अहमद म्हणाले की, मी या मतदारसंघातील रस्त्यावर झोपलेला व्यक्ती आहे. मला येथील समस्या माहिती आहेत.फहाद अहमद यापूर्वी समाजवादी पक्षात होते, त्यांनी सपा सोडली आहे. त्यांनी शरद गटात सामील प्रवेश केला. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांची मुळे 'समाजवाद' शी जोडलेली आहेत. महाराष्ट्रातील जनता सध्याच्या सरकारपासून मुक्त होण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत आहे. जसे समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP), मुलायमसिंह यादव, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अखिलेश यादव यांचा विचार एकच आहे. मी शरद पवार यांचा आभारी आहे, मला त्यांनी येथून लढण्यासाठी संधी दिली.












Click it and Unblock the Notifications