Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धनंजय मुंडेंनी कराडच्या एन्काऊंटरची दिली होती सुपारी, निलंबित PSIचा दावा अन् मुंडेंचा पाय खोलात

PSI Ranjeet Kasle on Dhananjay Munde : निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटर करण्याबाबतचा मोठा खळबळजनक दावा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी दिली होती, असा आरोप कासलेंनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचा पाय खोलात जाणार का अशी चर्चा आता रंगली आहे.

दुसरीकडे, धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडचा काटा का काढणार होते, याबाबतही रणजित कासले आणि करुणा मुंडे यांनी माहिती दिली. त्यामुळे धनंजय मुंडे यांची भविष्यात अडचणी वाढणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

Suspended PSI Ranjit Kasle

धनंजय मुंडेंनाच वाल्मीक कराड नकोय?

धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता. कारण त्यांची काही अंडीपिल्ली तो बाहेर काढणार होता. त्यांचा संबंध आला असता तेही 302 मध्ये आरोपी झाले असते. आता होणारही नाहीत, कारण त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे, असा रणजित कासले यांनी एका व्हिडिओद्वारे दावा केला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि नंतर पन्नास कोटींची ऑफर देखील आपल्याला मिळाली होती, असा दावा रणजित कासले यांनी केला होता. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

रणजित कासले व्हिडिओत काय म्हणाले, जसेच्या तसे, वाचा?

रणजित कासले आपल्या व्हिडिओत म्हणाले की, वाल्मीक कराडच्या एकन्काऊंटरविषयी मी अनेक चॅनेलला मुलाखती दिल्या. माझे मत मांडले. त्यानंतर 14 एप्रिलच्या दिवशी माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. गजानन कांडकर यांनी बीडच्या एका पोलिस ठाण्यात यासंबंधीची फिर्याद दिली. बोलण्याच्या ओघात मी काही चुकीचे बोललो असेल तर मी त्यांची माफी मागतो. पण मी हे जाणिवपूर्वक बोललो नाही. आता माझ्यावर असाही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही.

वाल्मीक कराडचे एन्काऊंतर करण्याचा प्रयत्न कुणी केला हे मी सांगतो. धनंजय मुंडे यांनाच वाल्मीक कराड नको झाले होते. कारण, त्यांची काही अंडी-पिल्ली ते बाहेर काढणार होते. त्यामुळे ते आज खुनाच्या आरोपात सहआरोपी झाले असते. मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप सपोर्ट आहे. संतोष देशमुख प्रकरणात अनेक महत्त्वाचे पुरावे दाबण्यात आलेत. त्यामुळे धनंजय मुंडे आता या प्रकरणात सहआरोपी होणार नाहीत, असे ते म्हणाले.

रणजित कासले यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांना आपल्याला पकडून दाखवण्याचे आव्हानही दिले. मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो. त्यांनी मला पकडून दाखवावे. मी सायबरमध्ये काम केले आहे. 20 वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहे. त्यांनी कितीही टीम दाखवून द्या, मी कुणालाही भेटणार नाही. मी रोज दोन गाड्या चेंज करतो. इथून पुढे मी दोन कार, दोन मोबाईल, दोन आयएमईआय, दोन राज्य सर्वकाही चेंज करणार. या सरकारने मला पकडून दाखवण्याचा प्रयत्न करायाच आणि मग बघायचे. तत्पूर्वी, मी खऱ्या व न्यायाच्या मार्गाने जाणार आहे. मी कोर्टात आजच अटकपूर्व जामीन याचिका दाखल करणार आहे. माझी वकिलांशी चर्चा झाली आहे, असेही ते या व्हिडिओत म्हणालेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+