धसांचा गौप्यस्फोट ! आकाची संपत्ती सांगत, करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवणाऱ्याचे नावही सांगितले
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पैठण येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आ. सुरेश धस आदी उपस्थित होते. हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मोर्चात आ. सुरेश धस यांनी चौफेर फटकेबाजी करत पुन्हा नवनवे गौप्यस्फोट केले आहेत.

कुणी ठेवले पिस्तूल?
पैठण येथील मोर्चात सुरेश धस यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल टाकणारी बुरखा घालून आलेली व्यक्ती महिला नसून पोलीस होती, त्या पोलिसाचे नाव संजय सानप आहे, असा गौप्यस्फोटच सुरेश धस यांनी पैठणमधील जाहीर सभेतून केला. तसेच, करुणा शर्मा या तुमच्या पहिल्या पत्नी आहेत, अशी आठवणही धनजंय मुंडेंना करुन दिली. धस यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
या मोर्चामध्ये बोलताना सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, आकांनी भरपूर माल जमावला आहे. पैशांबाबत आकाने आंबानींना मागे टाकले की काय अशी शंका मला येऊ लागली आहे. आकांकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी आहेत. पुण्यातील मगरपट्ट्यात आकांनी एक अख्खा फ्लोअर विकत घेतलाय. ज्याची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी आहे. हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला.
आकाची प्राँपर्टीच मांडली
सुरेश धस यांनी आपल्या भाषणात आकाची प्राँपर्टीच जनतेसमोर मांडली. ते म्हणाले, मला बिल्डरकडून आकाच्या संपत्तीची माहिती मिळाली. पुण्याच्या एफसीरोडवर आकाने सात दुकानं बुक केली आहेत. ज्या एका दुकानाची किंमत पाच कोटी रुपये आहे. आका शंभर टक्के 302 चा आरोपी आहे. परळीत एका वर्षात तब्बल 109 मृतदेह सापडले आहेत. त्यातील अनेक मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये. आकाने मोठ्या आकाला जर फोन केला असेल, तर मोठ्या आकाचाही नंबर पोलिस तपासात येईल. मात्र आकाची प्राँपर्टी पाहून आकाने संपत्तीच्या बाबतीत अंबानीलाही मागे टाकले असावे, असे मला वाटते.
एक आरोपी अद्यापही फरार
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आतापर्यंत सीआयडी व आयटीएसने सहा आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फरार आरोपी लवकरच अटक होईल, असेही पोलिसांनी वारंवार सांगितले आहे.












Click it and Unblock the Notifications