Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सुरेश धस- धनंजय मुंडे भेट: जरांगे-दमानियांची जोरदार टीका; तर सुरेश धसांनी सांगितलं भेटीचं कारण

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री मुंडे व आमदार धस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. धसांनी तर थेट मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. मात्र आता धसांनी थेट मुंडे यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतल्याने एकच चर्चा सुरु झाल्या. ही भेट नेमकी कशासाठी होती, हा प्रश्न विचारला जाऊ लागला.

Suresh Dhas-Dhananjay Munde

नेमकं काय झालं?

आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतल्याच्या बातम्या आज आल्या. याबाबत पत्रकारांनी थेट धस यांना याबाबत विचारले. त्यावर धस यांनीही भेट घेतल्याचे कबुल केले. ते म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांची भेट घेतली आहे. त्यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांना भेटायला मी गेलो होतो. कुणाच्याही तब्बेतीची विचारपूस करणे, यात काही गैर नाही. आमचा लढा सुरुच राहणार आहे, असंही धस यांनी स्पष्ट केलं.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं, धस यांनी सांगितलं. या भेटीवर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ही भेट दुर्दैवी असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. या भेटीबाबत दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

धस- मुंडे यांच्या भेटीबाबत आज मनोज जरांगे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्यांना भेटायला गेले ते काय कोमामध्ये होते का? पारिवारीक भेट म्हणता मग ते काय तुमचे चुलते होते का? पदासाठी व स्वार्थी राजकारणासाठी एकडून तिकडे हिंडायचे असेल तर धसांनी या प्रकरणात यायचे नाही. या प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तरी त्याची जबाबदारी सुरेश धस यांची राहिल. मराठ्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता. मात्र त्यांनी आता विश्वासघात केलाय, अशी थेट नाराजी जरांगे यांनी मांडली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+