Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सुरक्षेचे धिंडवडे! दूध घ्यायचा बहाणा, 40 सेकंदात मंगळसूत्र हिसकावलं! सुप्रिया सुळेंकडून VIDEO पोस्ट

Supriya Sule Shares CCTV of Gold Chain Snatching in Warje : पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पुण्यातील वारजे भागातील एका दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.

ही धक्कादायक घटना पुण्याच्या वारजे भागात घडली, ११ ऑक्टोबरची ही घटना असून या घटनेनंतर आता सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी जारी केला व घटनेचे गांभीर्य दाखवून दिले आहे. या घटनेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरले.

Supriya Sule Shares CCTV of Gold Chain Snatching in Warje

नेमकी घटना कधी आणि कशी घडली?

घटनेची वेळ: ही घटना शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी येथील 'सिप्ला फाऊंडेशन' जवळील 'पूजा हायलँड सोसायटी'च्या तळमजल्यावर असलेल्या एका किराणा मालाच्या दुकानात घडली.

चोरीची पद्धत: एका महिलेचे पती किराणा मालाचे दुकान चालवतात आणि घटनेच्या वेळी ती महिला दुकानात एकटी होती. रात्री अकराच्या सुमारास 'ताई, दुधाची पिशवी द्या' असे बोलून एक झकपक पेहरावातील तरुण दुकानात शिरला. दूध घेतल्यानंतर पैसे देण्याच्या बहाण्याने त्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि बाहेर उभ्या असलेल्या साथीदारासोबत दुचाकीवरून भरधाव वेगाने पळ काढला.

सुप्रिया सुळेंची पुणे पोलिसांकडे मागणी

या घटनेचा संपूर्ण थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ आपल्या 'एक्स' सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून तीव्र संताप व्यक्त केला, आणि पुणे पोलिस आयुक्तांकडे गुन्हेगारी कमी व्हावी या उद्देशाने पोस्टमध्ये मागणी केली आहे.

सुप्रिया सुळेंची एक्स पोस्ट काय आहे?

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे, पुणे येथील हा व्हिडीओ आहे. गुन्हेगार कसे मोकाट सुटलेत याचे हे आणखी एक उदाहरण..! हे चित्र पुण्यासारख्या शहरासाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी ही विनंती. अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्यांना चाप लागलाच पाहिजे."

मंगळसूत्र चोरीचा पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध पथक तपास करत आहे. पुण्यासारख्या शहरात ऐन दिवाळीच्या तोंडावर भररस्त्यात व दुकानात घुसून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+