सुप्रिया सुळेंकडून फडणवीस आरोपीच्या पिंजऱ्यात, पहा काय घडलं...
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. ड्रग्ज प्रकरण, कार अपघात आणि आता महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, या सर्व प्रकरणांवरुन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टिकेची झोड उठवली.

खासदार सुप्रिया सुळे व रोहित पवारांनी गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले. पुणे ही क्राइम कॅपिटल होत असल्याचं म्हटलं. तर, गृहमंत्री झोपले आहेत का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
सरकारवर टिका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे. पुण्यात सातत्याने क्राईम वाढत आहे. महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे. नागपूर नंतर आता पुण्यात गुन्हेगारी हाताबाहेर जात आहे. महाराष्ट्र सरकार काय करते? महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात? सातत्याने हे सुरू आहे.
या राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. 200 आमदारांचे सरकार आहे, पण तुमच्या आणि माझ्या पदरात काय पडले, विकास कोणाचा केला या सरकारने ? महाराष्ट्राचा आज देशात नंबर खाली जायला लागला आहे, असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला. रवींद्र वायकर यांना क्लिन चीट दिल्यावरूनही खा. सुळेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं.
नेमकं काय होतं प्रकरण
वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वाहतूक विभागाच्या विश्रामबाग कार्यालयासमोर ही घटना घडली. याप्रकरणी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटकही करण्यात आली. बुधवार चौकात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू असताना हा प्रकार घडला.












Click it and Unblock the Notifications