Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बायकोच्या आड लपून उद्योग करतो! 6 महिने थांबा आणखी एका मंत्र्‍याची विकेट पडणार! सुप्रिया सुळेंचा दावा

Supriya Sule : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पक्षीय कार्यकर्तांसमोर भाषण केले. त्यावेळी त्यांनी "...आता सहा महिने थांबा आणखी एक विकेट पडणार आहे." असे वक्तव्य सुळे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात आयोजित पक्षातील बैठकीमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी असे वक्तव्य केले व धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

Supriya Sule claims that another minister will resign

नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शंभर दिवसांत एक बळी गेला. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल.

राज्यातील एक मंत्री खूपच बोलतोय..!

सुप्रिया सुळे म्हणाल्या, बायकोच्या आड बोलणाऱ्या त्या मंत्र्‍याचा बळी जाणार आहे. राज्यातील एक मंत्री खूपच बोलतोय.तो डरपोक मंत्री कोण हे लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे. चार ते सहा महिन्यात त्यांचीही विकेट पडेल.

बर झालं पक्ष फुटला..! - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी पक्षीय कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यासंदर्भात एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, बर झालं पक्ष फुटला दोन मुलं असलेल्या बायगोच्या वाहनात बंदूक जो ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही. मी विरोधी पक्षांत आयुष्य काढेल पण नैतिकता सोडणार नाही.

ते मंत्री नेमके कोण?

सुप्रिया सुळेंचे विधान आता चांगलेच चर्चेत आहे पण ते मंत्री नेमके कोण आहेत हे मात्र समजू शकलेले नाही. आता सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची आणि संबंधित मंत्री कोण याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मस्साजोग प्रकरणी काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

मस्साजोग येथे मी संतोष भाऊंच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या आईने माझा हात धरला. तेव्हा त्या म्हणाल्या की, मला न्याय द्या असे त्या म्हणाल्या. मला कधी-कधी वाटतं की बरं झालं पक्ष फुटला असेही त्या म्हणाल्या. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर काही आरोपही होत आहेत. वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्यावरूनही विरोधकांनी मुंडेंना घेरले. त्यानंतर राजीनामाही त्यांना द्यावा लागला. त्यादरम्यान करुणा शर्मा यांनी केलेले आरोप अशा सर्व बाबी पाहता सुप्रिया सुळेंचे बरं झालं पक्ष फुटला हे वक्तव्य चर्चेत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+