Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांचा फोटो वापरू नका,स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, सुप्रीम कोर्टाने दिले अजित पवार गटाला निर्देश

Supreme Court Hearing On NCP Party And Symbol : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत आज 13 नोव्हेंबर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचे फोटो वापरु नका. स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश अजितदादाच्या गटाला दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी दि.19 नोव्हेंबरला मंगळवारी होणार आहे.

'निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करा'

अजित पवार गट आणि शरद पवार गटाने निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत केली आहे. अजित पवारांकडून वारंवार शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जातो, अशी तक्रार शरद पवारांच्या वकिलाने केली आहे. याप्रकरणी बोलताना कोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं. दरवेळी मतदारांवर व्हिडिओ वगैरेचा प्रभाव पडेलच असे नाही, कधी कधी तो प्रभाव पडतो. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असा सल्ला कोर्टाने दिला आहे.

Ajit Pawar Vs Sharad Pawar

तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे

यावेळी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जरी तो व्हिडिओ जुना असेल किंवा काहीही असले तरी तुम्ही शरद पवारांचा चेहरा का वापरता? असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला.

तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो , व्हिडीओ कशाला वापरले पाहिजे. जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत, तर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, असे अजित पवार गटाला खडसावले. आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांचे फोटो व्हिडीओ वापरत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाने दिले.

यापूर्वीच्या सुनावणीत डिस्क्लेमरचे निर्देश

यापूर्वी या प्रकरणावर बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी घड्याळ निवडणूक चिन्हाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे डिस्क्लेमर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 36 तासांच्या आत वर्तमानपत्रात प्रकाशित करावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. कोर्टात वेळ वाया घालवू नका, तर मतदारांना आकर्षित करा, असेही न्यायालयाने शरद पवार गट आणि अजित पवार गटाला सांगितले होते.

NCP निवडणूक चिन्हाशी संबंधित यापूर्वी झालेल्या 5 सुनावण्यात काय झालं?

6 नोव्हेंबर : घड्याळ निवडणूक चिन्हाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे डिस्क्लेमर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 36 तासांच्या आत वर्तमानपत्रात प्रकाशित करावे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांना कोर्टात वेळ वाया घालवू नका, तर मतदारांना आकर्षित करण्यास सांगितले होते.

24 ऑक्टोबर : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 'घड्याळ' हे चिन्ह वापरता येईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, मात्र तो वादाचा विषय आहे आणि न्यायालयात प्रलंबित आहे असे निवडणूक बॅनर आणि पोस्टर्समध्ये नमूद करावे लागेल.

4 एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) हे नाव आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह वापरावे, असे निर्देश दिले होते. न्यायालयाने म्हटले होते - दुसऱ्या शब्दांत, याचिकाकर्ते शरद पवार किंवा त्यांचे समर्थक घड्याळ चिन्ह वापरणार नाहीत.

19 मार्च : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांचे निवडणूक चिन्ह 'तुतारी वाजवणार माणूस' याला मान्यता दिली होती. अजित पवार गटाला त्यांच्या निवडणूक चिन्ह घड्याळीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती देण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये जाहीर जाहिराती देण्यास सांगण्यात आले. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनाही प्रत्येक टेम्प्लेट, जाहिरात, ऑडिओ-व्हिडिओ क्लिपमध्ये घड्याळ निवडणूक चिन्हाचा कोर्टात विचार सुरू असल्याचे नमूद करावे लागेल.

14 मार्च : सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना सुनावलं होतं - शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असं अजित पवार गटानं लिहावं. कोर्ट म्हणाले- आता तुम्ही वेगळा पक्ष आहात, स्वतःची ओळख निर्माण करा. तसेच 18 मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले. अजित पवार गटाला शरद पवार यांचे छायाचित्र वापरणार नाही, अशी बिनशर्त लेखी हमी देण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+