Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सूर्य, चंद्र, तारे असतील तोवर पवार, शिंदे, फडणवीसांचं नाव कायम राहील - तटकरे

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्रीपदावरून महायुतीतील पक्षांमध्ये वाद सुरू असून, त्याचा केंद्रबिंदू ठरतोय रायगड जिल्हा. या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात तणाव आहे.

sunil tatkare

शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर माणगाव येथे एका कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले आणि तटकरे यांनी केलेल्या भाषणाने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा पेटली.

कार्यक्रमात बोलताना तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव घेत त्यांचं भरभरून कौतुक केलं. "जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि तारे आहेत, तोपर्यंत या तिन्ही नेत्यांची नावे पुसली जाणार नाहीत," असं भावनिक आणि खणखणीत विधान करत तटकरेंनी महायुतीतील नेतृत्वाबद्दल आपली निष्ठा दर्शवली.

माणगाव येथे एका सीबीएसई शाळेच्या उद्घाटनप्रसंगी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या शाळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईचं नाव देण्यात आलं आहे. या प्रसंगी स्वतः एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि खासदार तटकरे एकत्र व्यासपीठावर उपस्थित होते.

शाळा उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक भाषण करत, "शाळेला माझ्या मातोश्रींचं नाव दिल्याबद्दल मी व्यवस्थापनाचे आभार मानतो. अशा प्रसंगी आईची आठवण येतेच. मी १२वी पास झालो नाही, पण आम्ही गुवाहाटीची परीक्षा मात्र पास केली," असा हलकाफुलका टोला स्वतःवर मारत ते हसले.

शिंदेंनी यावेळी देशाच्या सुरक्षेवरही भाष्य केलं. "पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला. आपल्या लष्कराच्या शौर्यामुळे पाकिस्तान आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

दरम्यान, तटकरे यांनी आपल्या भाषणात सत्ता आणि जबाबदारी यावर भर देत म्हटलं की, "सत्ता ही केवळ उपभोगासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे. तिचं मूल्यमापन कामाच्या माध्यमातून व्हायला हवं."

राजकीय मतभेद असले तरी विकासकामांच्या निमित्ताने एकत्र आलेले हे नेते - विशेषतः तटकरेंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा अप्रत्यक्षपणे केलेला सल्ला आणि महायुतीतील नेतृत्वाबद्दलची सकारात्मक भूमिका यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+