एकनाथ शिंदेंना धक्का ! 'शिंदे गटात जाणं आयुष्यातली मोठी चूक होती', ठाकरे गटात मोठा प्रवेश

राजकारणात नेहमीच वाऱ्याची दिशा बदलते, मात्र काही बदल खोल ठसे उमटवतात. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या, आणि आता पुन्हा ठाकरे गटात परतलेल्या सुजाता शिंगाडे यांनी आपल्या भावनिक शब्दांत हा अनुभव मांडला.

sujata shingade

"शिंदे गटात जाणं ही माझी आयुष्यातली मोठी चूक होती," असं स्पष्टपणे सांगत त्यांनी मातोश्रीवर 'घरावापसी' करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला.

चार महिन्यांची व्यथा: 'रात्रभर झोप येईना'

ठाकरे गटात पुनर्प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिंगाडे म्हणाल्या की, शिंदे गटात गेल्यानंतरचे चार महिने त्यांच्या आयुष्यातील सर्वात अस्वस्थ होते. "मी तिथे होते पण मनात समाधान नव्हतं. इतकी अस्वस्थ होते की रात्रभर झोप लागत नव्हती," असं सांगताना त्यांनी हात जोडून आपली व्यथा मांडली.

त्यांनी पुढे सांगितले की, "तिकडे केवळ देखावा आहे. खरा आत्मा मातोश्रीतच आहे. जे काही तिथे दिसतं, ते वरवरचं आहे. मला कुठलंच पद किंवा अमिष मोहात पाडू शकलं नाही. मी ३५ वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं. हे घरच आहे आणि मी परत आले आहे."

शिंदे गटावर आरोप: "अंधाधुंदी आणि दिशाहीन नेतृत्व"

सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटात काम करताना घेतलेला अनुभवही खुला केला. त्यांनी सांगितले की, "मला काही बैठका घ्यायला सांगितल्या होत्या. पण तिथे एकसंधपणा नव्हता, कुणाचं कुणाशी तालमेल नव्हता. निर्णयप्रक्रिया गोंधळात होती. पैसे देऊन लोकांना पक्षात घेतलं जात होतं. ही सगळी प्रक्रिया खूप निराशाजनक होती."

त्यांनी अधिक स्पष्ट करत सांगितले, "माझं शिंदे गटात जाणं कोणत्या इच्छेने नव्हतं, तर माझ्या विभागातील अंतर्गत वादांमुळे मी तिथे गेले. पण आता मला जाणवतं की ते एक चुकलं पाऊल होतं. मी परत आले आणि आता शांत आहे."

मातोश्रीचं प्रेम, उद्धव ठाकरेंचा विश्वास

"माझं खरं घर हे मातोश्री आहे," असं सांगताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेत्रुत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. "उद्धव साहेबांसारखा नेता दुसरा नाही. त्यांनी मला जे काही दिलं, त्याबद्दल मी नेहमी ऋणी राहीन. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे वहिनींनी माझ्याशी बोललं, खूप आत्मीय वाटलं."

शेवटी त्यांनी भावनिक आवाहन केलं, "जे गेलेत त्यांनीही परत यावं. बाहेर जाऊन कुठलं समाधान नाही. धनुष्यबाण मिळो वा न मिळो, शिवसेना आपली आहे आणि ती आपण मोठी करू. मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन असं त्या म्हणाल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+