Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'उद्या नाही, ते आपल्याकडे परवा येणार आहे...'; सुधीर मुनगंटीवारांना नेमकं काय म्हणायचंय..?

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळाच्या यादीने अनेक दिग्गजांच्या अपेक्षावर पाणी फेरले. अनेकांना धक्का दिला. ज्या नेत्यांना डच्चू मिळाला, त्यांची खदखद आता एकामागून एक समोर येऊ लागली आहे. छगन भुजबळ, विजय शिवतारे यांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर आपली खंत बोलून दाखवली. तानाजी सावंत तर अधिवेशन सोडून थेट पुण्याला निघून आले. दीपक केसरकरही स्तब्ध राहिले. आता भाजपच्या यादीतून डावलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची खदखद समोर आली आहे.

Sudhir Mungantiwar

माझं नाव गेलं कुठे?

प्रसार माध्यमांनी सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याबद्दल विचारले. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, "मी व्यथित असण्याचं कारणच नाही. मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष मला जे पद देतो, मी त्या पदासाठी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे, मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं होते. मात्र कालच्या यादीत ते नव्हतं. मुद्दा एवढाच आहे की, कालपर्यंत नाव असताना ते का वगळण्यात आलं..? बाकी मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही. मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो. आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडेल."

फडणवीसांबाबत नाराजी?

काही वेगळी जबाबदारी देण्यासाठी तुमचं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून वगळलं का..? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर मुनगंटीवार म्हणाले, "दुसरी जबाबदारी देणार असतील तर मग तेच खरं... कारण ते सर्व त्यांनाच माहिती असणार. त्यांनीच सांगितलंय तर मग माझ्याकडून उत्तर का घेताय...? माझं वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही. तुमचं (पत्रकारांचं) वरिष्ठांनी बोलणं होत असतं. त्यामुळे माझ्याबद्दल काय, हे तुम्हाला जास्त माहिती असणार... असा प्रतिप्रश्न मुनगंटीवार यांनी केला.

नितीन गडकरींची घेतली भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुम्ही भेट घेतली आहे. त्यात काय चर्चा झाली? असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. ते म्हणाले "अशी चर्चा टीव्ही चॅनलवरुन सांगायची असते का..? मोठ्या आणि छोट्या भावाची ती भेट होती. आता ती भेट का होती, हे कसं सांगायचं. जेव्हा-जेव्हा माझ्याबाबत काही वेगळे प्रसंग येतात तेव्हा-तेव्हा मी त्यांचे मार्गदर्शन घेतो. त्यांचं मार्गदर्शन नेहमीच उचित असतं. मला चांगली जाणीव आहे, काल जे आपल्याकडे होतं ते उद्या जाणार आहे. उद्या आपल्याजवळ जे नाही ते परवा येणार आहे", असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+