BJPतील 'अंतर्गत कल्लोळ' चव्हाट्यावर! मुनगंटीवारांचा थेट पक्षनेतृत्वावर निशाणा; पराभवाचे खापर कोणावर?
Sudhir Mungantiwar Attacks Devendra Fadanvis : महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने यशाची गुलाल उधळला, तरी देखी चंद्रपूरमधील पराभवाने पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.
"नेतृत्वानेच गटबाजीला चालना दिली," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी ७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवल्याने मुनगंटीवार आक्रमक झाले अन् पराभवाचे खापर त्यांनी पक्षाअंतर्गत गटबाजी व मंत्रिपद नसल्याने नाराजी व्यक्त केली.

"पक्षनेतृत्वानेच गटबाजी पोसली"
मुनगंटीवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत सर्वात मोठा हल्ला पक्षाच्या कार्यपद्धतीवर केला. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षात पक्षात गटबाजीला पोषक वातावरण निर्माण झाले. "जिल्ह्यातील नेत्यांना किंवा जिल्हाध्यक्षांना विश्वासात न घेता नवीन लोकांना पक्षात प्रवेश दिला जातो. यामुळे पक्षात नवे गट तयार होतात आणि जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण होते," असे त्यांनी नमूद केले.
मंत्रिपद नसल्याने विकास खुंटल्याची भीती
विदर्भातील विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भाजपची कामगिरी खालावली आहे. यावर भाष्य करताना मुनगंटीवार म्हणाले. काही जिल्ह्यांमध्ये चार-चार मंत्रिपदं दिली असताना, या चार जिल्ह्यांना मात्र सत्तेत स्थान मिळाले नाही. आपल्या जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने विकास होईल की नाही, अशी शंका मतदारांच्या मनात निर्माण झाली आणि त्याचा परिणाम निकालांवर झाला.
"माझ्याकडे जबाबदारीच नव्हती"
चंद्रपुरातील पिछेहाटीबद्दल बोलताना मुनगंटीवार यांनी स्वतःला जबाबदारीतून मुक्त केले. "मी आता मंत्री नाही आणि पक्षाने मला कोणतीही अधिकृत जबाबदारी दिली नव्हती. ज्यांनी निर्णय घेतले, त्यांनीच आता या निकालांचा विचार करावा," असे म्हणत त्यांनी चेंडू प्रदेश नेतृत्वाच्या कोर्टात टोलवला आहे. पक्षात नेमके निर्णय कोण घेत आहे, हेच समजत नसल्याचेही त्यांनी उपरोधिकपणे म्हटले.
संघाच्या विचारांचा विसर?
पक्षात होणाऱ्या 'इनकमिंग'वर टीका करताना मुनगंटीवारांनी थेट वैचारिक अधिष्ठानाचा मुद्दा उपस्थित केला. "जे लोक आयुष्यभर संघाच्या विचारांना विरोध करत आले, ते जर आज पक्षनेतृत्वाच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर सामान्य कार्यकर्ता संभ्रमात पडतो," असे सांगत त्यांनी बाहेरून आलेल्या नेत्यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली.
'शनिशिंगणापूर'च्या उपमेवरून टोला
मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी "भाजपची दारे शनिशिंगणापूरच्या मंदिरासारखी उघडी आहेत," असे विधान केले होते. त्याचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, प्रवेश देताना किमान जिल्ह्यातील नेत्यांना विचारणे ही शिस्त असायला हवी, जी सध्या पाळली जात नाहीये.
मुनगंटीवारांच्या आरोपांचे राजकीय अर्थ!
सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील भाजपचे कणा मानले जातात. त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली ही नाराजी केवळ चंद्रपूरपुरती मर्यादित नसून, ती आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी पक्षनेतृत्वासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी "आम्ही त्यांना ताकद देऊ" असे म्हटले असले, तरी मुनगंटीवारांचे हे प्रश्न भाजपला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आहेत.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा








Click it and Unblock the Notifications