Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अद्यापही महायुतीचे 73 तर MVAचे 41 जागांवर नो उमेदवार; अर्ज भरण्यास उरले फक्त 2 दिवस, तिढा सुटेना!

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. सर्व पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली. महाराष्ट्रात प्रामुख्याने असलेल्या महायुती व महाविकास आघाडीतील मात्र जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे दिसून येत आहे. अवघे दोन दिवस अर्ज भरण्यास बाकी असताना अजूनही मविआ व महायुतीकडून सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा झालेली नाही.

जागावाटपाचा मुद्दा इतका गुंतागुंतीचा आहे की, त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत महायुतीच्या नेत्यांची बैठक नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडली. तर दुसरीकडे जागावाटपावरून महाविकास आघाडीतही (काँग्रेस, शरद गट आणि उद्धव गट) यांच्यात तणाव सुरूच आहे.

Maharashtra Assembly Election 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. मात्र सत्ताधारी महायुती आघाडी आणि महाविकास आघाडीकडून अजूनही काही जागांवर अडून बसले आहेत.

मविआमध्ये अद्यापपर्यंत झालेले जागावाटप

  • शिवसेना (UBT)- 84 जागा
  • काँग्रेस- 87 जागा
  • NCP (SP)- 76 जागा
  • एकूण-247
  • उरलेल्या जागा - 41

महाययुतीत 73 जागावाटप रखडलेले

  • भाजप- 121
  • शिवसेना - 45
  • राष्ट्रवादी- 49
  • एकूण- 215
  • उरलेल्या जागा : 73

MVA मध्ये किती याद्या कोणी प्रसिद्ध केल्या?

  • उद्धव गटाने आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या असून, पहिल्या यादीत ६५, दुसऱ्या यादीत १५ आणि तिसऱ्या यादीत ४ नावे जाहीर करण्यात आली आहेत.
  • काँग्रेसनेही आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या असून, काँग्रेसने पहिल्या यादीत 48, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवार उभे केले आहेत.
  • शरद गटानेही आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत 45, दुसऱ्या यादीत 22 आणि तिसऱ्या यादीत 9 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरी 41 जागांवर अद्यापही घोळ कायम आहे.

महायुतीत आत्तापर्यंत कशा झाल्या याद्या जाहीर

दुसरीकडे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने एकूण 121 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यासाठी पक्षाने दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत 99 आणि दुसऱ्या यादीत 22 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेने एकच यादी जाहीर केली असून, त्यात 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्याचवेळी अजित गटातील राष्ट्रवादीने एकूण 49 उमेदवार उभे केले असून, पक्षाने पहिल्या यादीत 38, दुसऱ्या यादीत 7 आणि तिसऱ्या यादीत 4 नावे जाहीर केली आहेत. मात्र, अजूनही 73 जागांसाठी उमेदवार जाहीर झालेले नाहीत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+