एसटी कर्मचा-यांचा संपाचा आज दुसरा दिवस, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार ?
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे यासह इतर मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. 3) बेमुदत संप सुरू केला आहे.एसटी कर्मचा-यांचा संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे लाल परीचे चाके थांबली असून, ऐन सणासुदीत प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या संदर्भात आज मुख्यमंत्री सायंकाळी 7 वाजता वर्षा निवास्थानी एसटी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा करून तोडगा काढणार आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.

ऐन गणेशोत्सवासह सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने राज्यभरातील चाकरमान्यांसह प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या असा इशारा देत राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. दरम्यान, राज्यातील विविध आगारातील बसेस बाहेर न पडल्याने गावखेड्यातील प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे.
राज्यभरातील महामंडळांच्या आगारांमध्येही मंगळवारी सकाळपासून संपाला सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने मुंबई, कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, गुहागर, छत्रपती संभाजीनगर या बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिलेला आहे. एसटी आगाराच्या बाहेरच न पडल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. दुसरीकडे खासगी वाहनचालकांकडून दुपट्टीने भाडे वसूली केली जात असल्याचे देखील चित्र आहे.
एसटी कामगारांच्या काय आहेत मागण्या ?
एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे,खाजगीकरण बंद करा,सुधारीत जाचक शिस्त, आवेदन कार्यपद्धती रद्द करा,इनडोअर, आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा
जुन्या झालेल्या बस काढून टाका,स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचा-यांना अद्ययावत विश्रांतीगृह द्या.वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्ती वेतन द्या.सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणापत्रानुसार दुरूस्ती करा. एसटी कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचा मोफत पास द्या याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.












Click it and Unblock the Notifications