SSC Board 2025 10th Result: उद्या दहावीच्या 16 लाख विद्यार्थ्यांचा 'निकाल'! कसा तपासायचा येथे वाचा
SSC Board 2025 10th Result : दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार याचीच प्रतिक्षा आहे. निकालाची तारीख जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. शिक्षण विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राच्या दहावी (एसएससी) बोर्डाचे निकाल 13 मे रोजी मंगळवारी जाहीर होणार आहेत.
शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार, टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, "निकाल 13 मे रोजी जाहीर होऊ शकतात. या वृत्तानुसार, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हेही म्हटले की, "निकाल 12 मे रोजी जाहीर करता आले असते, परंतु या दिवशी सुट्टी आहे. त्यामुळे आम्ही ते 13 मे पर्यंत पुढे ढकलले आहे."

आज 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमेमुळे राज्यात सुट्टी आहे. बोर्डाच्या इतिहासातील निकाल जाहीर करण्याची ही सर्वात जुनी तारीख असेल, जी परीक्षा लवकर सुरू झाल्यामुळे अपेक्षित होती.
कधी झाली होती परिक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास 16.11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता.
दहवीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in वर त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, म्हणजेच रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन निकाल तपासू शकतात. निकाल कसा चेक करायचा यासंदर्भात डिटेल्स माहिती जाणून घेऊया..!
राज्य मंडळाकडे एकूण नऊ विभागीय मंडळे आहेत. याद्वारे दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. यंदा परिक्षार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे गुणांकन करण्याचे काम जवळपास पुर्ण झाले असून बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार उद्या निकाल जाहीर होऊ शकतात.
निकाल कुठे पाहायचा?
दहावीचा निकाल एसएससी बोर्डाचे विद्यार्थी खालील वेबसाईटवर पाहू शकतात, या वेबसाईटवरुन निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट कशी काढावी याची माहितीही खाली पाहू शकता.
- mahahsscboard.maharashtra.gov.in
- mahresult.nic.in
- results.gov.in
- results.nic.in
- mahahsc.in
- mahahsscboard.in
निकाल कसा डाऊनलोड करायचा?
महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 2025 तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करा.
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवर, 'महाराष्ट्र दहावी किंवा दहावीचा निकाल 2025' लिंक तपासा.
- विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.
- महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.
- विद्यार्थी भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
- महाराष्ट्र दहावीचा निकाल 2025: तपशील तपासा
- CBSE Board Result 2025 : डिजीलॉकरवर दहावी, बारावीचा निकाल कसा तपासणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्र दहावीच्या बोर्डाच्या गुणपत्रिकेवर या तपशीलांचा असेल समावेश!
- विद्यार्थ्याचे नाव
- रोल नंबर/सीट नंबर
- जन्मतारीख,
- पालकांचे नाव,
- सर्व विषयांमध्ये मिळालेले गुण
- शाळेचे नाव, ग्रेड आणि
- पात्रता स्थिती (उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण)












Click it and Unblock the Notifications