यंदाची 10,12 वीची परीक्षा कधी, तारीख आली समोर, 10 दिवसांमध्ये झाला मोठा बदल, वाचा सविस्तर
SSC and HSC Exam 2025 timetable : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी दहावी, बारावीची यंदाची परीक्षा 10 दिवस आगोदर घेतली जाणार आहे. परीक्षेच्या तारखा समोर आल्या आहेत. तर यासंदर्भात असलेल्या हरकतींचा अभ्यास झाल्यानंतर यात बदल करण्यात आले आहे.
मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे.

सर्व केंद्रावर असणार सीसीटीव्ही वॉच
इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा होणार आहेत. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्यासंदर्भात केवळ 40 हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने नियोजित वेळापत्रक अंतिम केले आहे.
परीक्षा 10 दिवस अगोदर का?
महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत असे बघा वेळापत्रक इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन वेळापत्रक पाहाण्यासाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
परीक्षेचे वेळापत्रक (इयत्ता बारावी)
(इयत्ता बारावी)
प्रात्यक्षिक परीक्षा : 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
लेखी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च
(इयत्ता दहावी)
प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत
लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च












Click it and Unblock the Notifications