Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

छातीवर गोळ्या झेलण्याची भाषा अन् पोलिसांचा दट्ट्या! बॅलेटपेपर मतदान प्रक्रीया रद्द! हे प्रकरण काय?

Solapur News Protest against EVM in Markadwadi : राज्यात इव्हीएमद्वारे निवडणुका झाल्या. त्यात महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधी पक्ष महाविकास आघाडीने बॅलेटपेपरवर अर्थात मतपत्रिकेवरच मतदान घ्यायला हवे असा आग्रह धरत इव्हीएमविरोधात शंका उपस्थित केली. दरम्यान, आता मारकडवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील असे एक गाव आहे, जिथे गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू असा निर्धार केला गेला, आज चाचणी मतदान प्रक्रियाही सुरु झाली पण नंतर पोलिसांनी निर्वाणीचा इशारा दिला. पोलिसांच्या दट्ट्या पडल्याने बॅलेट पेपरवरील चाचणी मतदान प्रक्रीया रद्द केली गेली.

अर्थात मारकडवाडी गावातील हे प्रकरण काय आहे..मतदानप्रक्रीया का थांबवण्यात आली या सर्व गोष्टींचा धांडोळा आपण घेऊया.

Solapur News Protest against EVM in Markadwadi

काय आहे प्रकरण

सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी गावात मारकडवाडी येथे आज चाचणी (सॅम्पल) मतदान प्रक्रीया आज घेण्यात येणार होती. इव्हीएम मतदानप्रक्रीयेवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवरच मतदान घ्यायचे असा चंगच गावकऱ्यांनी बांधला होता. त्यासाठी छातीवर गोळ्या झेलू असेही बोलण्यात आले होते. त्यानंतर बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या चाचणी मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आज (3 डिसेंबर) रोजी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मारकडवाडी गावातील ग्रामस्थ मतदानप्रक्रिया राबवण्यावर ठाम होते.

आज सकाळी काय झाले..?

आज सकाळी मारकडवाडी ग्रामपंचायतीबाहेर मतदानासाठी नागरिक हळूहळू गोळा होणे सुरु झाले. बॅलेटपेपरद्वारे जसे मतदान होते तशी सर्व प्रक्रीया सुरु करण्यात आली होती. मतपत्रिकाही तयार झाली होती याशिवाय मतदान केंद्रावर विधान सभेच्या उमेदवारांच्या नावाची यादीही होती तसेच त्यावर शिक्का मारुन मतदानाची प्रक्रीया पार पाडली जाणार होती. पारदर्शक मतदान करण्याचा प्रयत्न म्हणून ही सॅम्पल चाचणी करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांचा होता.

चाचणी मतदानप्रक्रीया करण्याचे कारण काय?

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून विधानसभा निवडणुकीत मतं जेवढी दिली त्यापेक्षा कमी मत इव्हिएममध्ये होती. यामुळे गावकऱ्यांनी इव्हीएम मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता. दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठीच आज गावकऱ्यांनीच नियोजित मतदान प्रक्रीया ठेवली होती. म्हणजेच बॅलेट पेपर मतदान आग्रहासाठी मतदानप्रक्रीयेद्वारे आंदोलनाचाच एक हा भाग होता.

मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रियेला सुरुवात केली जात असताना मात्र, पोलिसांनी गावकऱ्यांना निर्वाणीच्या इशारा दिला. प्रशासनाने या आंदोलनरुपी मतदानाला आक्षेप घेतला. यानंतर या गावात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन येथील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

..म्हणून मतदानप्रक्रीया थांबवली! - जानकर

आपण पेट्या धरुन ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल. यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील, असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले. त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदानप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले.

काय आहे जानकरांचा आरोप?

माझ्या अभ्यासानुसार मला या गावात 1400 आणि समोरच्याला 502 इतकी मतं पडली. पण निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मारकडवाडीतून 1003 मतं पडल्याचे समोर आले. समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झाले, असा आरोप जानकर यांनी केला. त्यानंतर या गावात सॅम्पल मतदान होणार होते. मात्र, आता पोलिस बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याला विरोध करत आहेत. यामुळे आता आम्ही मोर्चा काढून हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू. पण हा उत्तमराव जानकर न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही, असे जानकर यांनी म्हटले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+