Solapur News : सोलापूरात भीषण अग्नितांडव, टेक्सटाईल मीलला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू, 5 जण अडकले!
Solapur News Fire in textile mill : सोलापुरमध्ये टेक्सटाईल मिलला आज पहाटे भीषण आग लागली असून या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे; तर आणखी पाच जण मिलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.
अक्कलकोट रोड एम आय डी सी मधील सेंट्रल टेक्सटाइल मिल मध्ये आज रविवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान लागलेल्या आगीत तीन कामगार होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.

पाच जणांना वाचवण्याचा प्रयत्न
मिलला लागलेल्या भीषण आगीत आणखी चार ते पाच अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित टेक्स्टाईलचे मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांचा आकडा 4 वर?
पहाटेपासून या भागामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, अग्निशामक दल यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आठ ते दहा गाड्या पाणी मारून झाले तरीही आग आटोक्यात येत नाही. या मध्ये आत अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आले असून यात चार जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती सांगण्यात आली. मृतदेह शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहेत.

आग कशी लागली?
पहाटे साडेचार च्या दरम्यान 108 ॲम्बुलन्सला फोन करण्यात आला. त्यानुसार कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून तीन ॲम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान आपत्ती निवारण करणे सुरुच असून आग कशी लागली याचा शोध आता यंत्रणा आणि प्रशासन घेत आहे.












Click it and Unblock the Notifications