नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 8 जणांवर काळाचा घाला; सोलापूर अन् जालना जिल्ह्यात भीषण अपघात

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्कलकोट येथून देवदर्शन घेऊन गाणगापूर कडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला. तसेच 7 ते 8 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्कार्पिओ कारने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांचा अपघात झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Solapur Latest Accident News

गंभीर जखमी असलेल्या इतर सात ते आठ रुग्णांना अक्कलकोट येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

गाणगापूरला जाण्याआधीच त्यांच्यावर काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गणगापूर येथील श्री दत्तच्या मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं होतं. त्यानुसार ते नांदेडमधून सोलापूरला आले. त्यांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते स्कॉर्पिओ कारने गणगापूरच्या दिशेनं जात होते. दरम्यान वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

सर्व भाविक स्कॉर्पिओ कारने गणगापूरच्या दिशेनं जात होते. मैंदर्गीजवळ गेले असता समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला कारची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती, की स्कॉर्पिओ करचा चक्काचूर झाला आहे. तर आयशर ट्रक देखील रस्त्याच्या कडेला उलटून पडला आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तर इतर सात ते आठजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

महाकाळा गावालगत उभ्या ट्रकवर कार धडकली, चौघे ठार

जालना: धुळे-सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या महाकाळा फाट्यावर आज दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कार पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

अनिता परसराम कुटे (वय ४८, रा.छत्रपती संभाजीनगर), भागवंत यशवंत चौरे (वय ४७), श्रृष्टी भागवंत चौरे (वय १३) वेधनंम भागवंत चोरे (वय ११ रा.जालना) अशी मृतांची नाव आहे.

या अपघातात परसराम लक्ष्मण कुटे आणि छाया भागवंत चौरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातगस्त भाविकांची ही कार अक्कलकोट इथून देवदर्शन करून छत्रपती संभाजीनगरकडे परत येत असतानाच ही दुर्घटना घडली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह गोंदी पोलिसांनी मदतकार्य केलं. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही दुर्घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+