सोलापुरात घडलं धक्कादायक, मतदानाच्या दिवशीच ठाकरेंना बसला धक्का, प्रणिती शिंदेंनी दिला धोका

Maharashtra Assembly Election 2024 : सोलापूर दक्षिण मतदारसंघात (Solapur District Assembly Constituency) खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. ऐन मतदानाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने सोलापूरात आघाडी धर्म न पाळल्याचे दिसून आले.

ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेनं ठाकरेंना धक्का बसला आहे. प्रणिती शिंदे यांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देत महाआघाडीचा धर्म पाळला असाही दावा केला.

Maharashtra Assembly Election 2024

सोलापूर दक्षिण विधानसभामतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. मात्र खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागा वाटपात या मतदारसंघावर केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगत आम्ही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या बाजूने मतदानाचे आवाहन केले असल्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

आघाडी धर्म आम्ही पाळला

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिला आहे. आघाडी धर्म आम्ही पाळला असून आम्ही एबी फॉर्म दिलेला नाही. या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून गेलं असेल असं वाटलं, पण आम्ही काडादी यांच्या मागे आहोत, जो जिता वही सिकंदर होणार असून आम्ही पक्षाकडून एबी फॉर्म न दिल्याने येथे आघाडी धर्म पाळला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+