Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Shrikant Shinde's post on X :श्रीकांत शिंदेंची पोस्ट चर्चेत- उपमुख्यमंत्रीपदाबाबत केले मोठे वक्तव्य

Shrikant Shinde's post on X : राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जरी स्पष्ट असले तरीही भाजपमधून सीएम कोण होणार हे गुढ कायम आहे. तर दुसरीकडे मंत्रीपदावर कुणा-कुणाची वर्णी लागणार हेच अजून स्पष्ट नसल्याचे चित्र आहे. अशातच श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? या चर्चा जोर धरत असताना आता खुद्द श्रीकांत शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

श्रीकांत शिंदे यांनी एक्सवरील त्यांच्या अकाऊंटवर उपमुख्यमंत्रीपदासंदर्भात एक पोस्ट केली आहे. आता ही पोस्ट चर्चेत आली असून यात सर्व प्रश्नांना त्यांनी पुर्णविराम देत खुलासाही केला आहे.

Shrikant Shinde s post on X

काय आहे श्रीकांत शिंदे यांची पोस्ट?

श्रीकांत शिंदेंनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला."

मी उपमुख्यमंत्री होणार...?

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होणार का? यावर आपलं मत पोस्टद्वारे स्पष्ट केले. या पोस्टमध्ये ते म्हणाले, "मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत."

मी संधी असूनही नाकारली..

श्रीकांत शिंदे यांनी केंद्रातील मंत्रीपदावर भाष्य केले आणि खुलासा केला. ते म्हणाले "लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो."

वास्तवाकडे पाठ फिरवू नका..

श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांना पोस्टमधून आवाहन केले आहे. ते म्हणाले, "माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा..."

काय होत्या चर्चा? आता पुर्णविराम

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दुसऱ्यांदा मिळणार नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे ते सरकारमध्ये सामिल होतील की केंद्रात मंत्री होतील अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यातच एकनाथ शिंदे मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. दरे गावी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. त्यामुळे सस्पेन्स वाढला होता. आता यावर श्रीकांत शिंदेंनी आपण उपमुख्यमंत्री होणार या चर्चा केवळ अफवा असून त्यात तथ्य नाही असे म्हणत या सर्व चर्चांना तूर्त पुर्णविराम दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+