Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी..! राज ठाकरेंच्या भेटीसाठी श्रीकांत शिंदे पोहोचले ‘शिवतीर्था'वर; चर्चांना उधाण...

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना नेते व खा. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी दुपारी अचानक थेट शिवतीर्थ गाठले. तेथे त्यानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. सध्या माहीम मतदारसंघावरुन मनसे व शिंदे गटात ताणाताणी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अचानक श्रीकांत शिंदे यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढविणार आहेत. अर्ज माघारी घ्यायला थोडाच अवधी शिल्लक असल्याने आता राज्यात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यामुळेच खा. शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

नेमकी कशासाठी घेतली भेट?

माहीम मतदारसंघात शिंदे गटाने विद्यमान आ. सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर केली. शिवाय त्यांना एबी फाँर्मही दिला आहे. मात्र त्यानंतर मनसेने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची माहीममधून उमेदवारी जाहीर केली. लोकसभेला मनसेने भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यामुळे लोकसभेला केलेल्या उपकाराची परफेड म्हणून महायुतीने येथून उमेदवार देऊ नये, असा मनसेचा आग्रह होता. मात्र सदा सरवणकर हे उमेदवारीवर ठाम असल्याने या मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे. त्याच पेचातून आज मनसेच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. त्यानंतर तातडीने खा. श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

Maharashtra Assembly Election 2024

भेटीत नेमकं काय ठरलं?

खा. श्रीकांत शिंदे हे शिवतीर्थावर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाल्या. मनसे व शिंदेगटाचा वाद वाढू नये, यासाठी ही भेट असल्याची चर्चा रंगली. राज ठाकरे किंवा खा. श्रीकांत शिंदे यांनी या भेटीबाबत मात्र अद्याप काहीही सांगितलेले नाही. मात्र सदा सरवरणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी, व दोन्ही पक्षातील वाद थांबवावा, याच विषयावर कदाचित ही भेट असावी अशी चर्चा होती. मात्र याला अद्याप कुणाकडूनही दुजोरा मिळालेला नाही.

सरवणकर उमेदवारीवर ठाम

माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर उमेदवारी करण्यावर ठाम आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या चर्चेवर ते म्हणाले, माझं आणि या मतदारसंघाचं नातं हे आई आणि मुलाखारखं आहे. त्यामध्ये खंड पडू देऊ नका. मला मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे. आशिर्वादाशिवाय एबी फॉर्म मिळत नसतो. मला महायुतीचा संपूर्ण पाठिंबा आहे. मी राजसाहेबांचीही भेट घेणार आहे. मी भेटीसाठी त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. त्यांनी वेळ दिल्यानंतर मी त्यांची भेट घेणार आहे. मला खात्री आहे, की ते मला आर्शीरवाद देतील, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+