Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली, एका प्रवाशाचा मृत्यू, 28 प्रवासी जखमी

अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नित्रंयण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमध्ये 28 प्रवाशी असून यातील काही प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे कळते.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस सकाळी नागपूरवरुन अकोल्याला निघाली होती, त्यावेळी एक गाय अचानक आडवी आली. शिवशाहीच्या चालकाने गायीला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली.

shivshahi bus accident on nagpur amaravati highway Llatest Update

या अपघातात 28 प्रवाशी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. जखमींना नजीकच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या अपघातामुळे महामार्गाव मोठी कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. क्रेनच्या साहाय्याने शिवशाही बस उचलण्यात आली असून यासाठी नागपूर- मुंबई महामार्ग काही वेळालासाठी बंद करण्यात आला. प्रवाशी आणि वाहनचालकांना या अपघातामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

असा झाला अपघात..

हा अपघात नेमका झाला याबाबत अपघातग्रस्त शिवशाही बसच्या चालकाने सविस्तर माहिती दिली आहे. नागपूरवरुन अकोल्याकडे बस घेऊन जातो त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर बसला आडवी आली, मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण बस उलटली. अशी प्रतिक्रिया चालकाने दिली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+