हृदयद्रावक बातमी ! 'तेथे' शिवशाहीचा भीषण अपघात; सात ठार, तर 20 जखमी
Accident of Shivshahi- नागपूरकडून गोंदीयाकडे येणार्या शिवशाही बसला मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातात १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहितीही मिळत आहे. हा अपघात एवढा भयानक होता की, या अपघाताचा आवाज दूरपर्यत गेल्याचे समजते.

कसा झाला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यात हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. नागपूरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस रस्त्यातच उलटली. अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ती शिवशाही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बसच्या काचा फुटल्या आणि आत बसलेले प्रवासी हे खिडकीच्या बाहेर फेकले गेले. बसखाली चेंगरुन तब्बल आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात तब्बल २० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचेही समजते.
मृतांचा आकडा वाढणार?
या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शिवाय जखमी तब्बल २० हून अधिक लोकांवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून गंभीर जखमींना तातडीने मोठ्या रुग्णालयात पाठवविले जात आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2024
या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार…
सरकारची तातडीने मदत
या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक











Click it and Unblock the Notifications