Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे एकही वाहन नाही, पण आहे 'एवढी' संपत्ती

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केलाय. त्या निमित्ताने त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील देखील प्रतिज्ञापत्रातून जाहीर केलाय. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे एकही वाहन नाही आणि त्यांच्याकडे फक्त 45 हजार रोकड तसेच त्यांच्या पत्नीकडे 36 हजारांची रोकड आहे.

Milind Narvekar

नार्वेकर यांची बँकेत 74 लाखांची ठेव असून पत्नीने मात्र बँकेत 8 कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. पोस्ट आणि विम्यात मिलिंद नार्वेकर यांनी 3 लाख 68 हजार गुंतवले आहेत आणि त्यांच्या पत्नीची 67 लाखांची गुंतवणूक आहे.

पत्नीच्या नावे तब्बल 12 कोटींचे शेअर्स

मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावे अवघे 50 हजारांचे साफल्य ट्रेडिंगचे समभाग आहेत तर त्यांच्या पत्नीच्या नावे 12 कोटी 40 लाख रुपयांचे समभाग आहेत. यात अदानी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यात नार्वेकर यांच्या पत्नीने 16 लाख रुपये गुंतवले आहेत. नार्वेकर यांच्या पत्नीकडे जीटीएल इन्फ्राचे 35 लाखांचे समभाग आहेत लोईडस मेटल या कंपनीत त्यांनी जवळपास 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. सकुमा एकस्पोर्त्स मध्ये 1 कोटी 20 लाख आणि मरीन इलेक्ट्रिकल 96 लाख, या कंपन्यांना मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीने पसंती दिलीय. त्यांच्याकडे एकूण 12 कोटी 40 लाखांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड युनिट्स आहेत.


मिलिंद नार्वेकर यांच्यावर 23 लाखांचे आणि पत्नीवर 3 कोटींचे कर्ज

मिलिंद नार्वेकर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःवर 26 लाखांचे कर्ज दाखविले आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे मात्र 3 कोटी 22 लाखांचे कर्ज आहे. नार्वेकारांकडे 24 लाखांचे सोने, 9 लाखांची चांदी आणि 36 लाखांचे हिरे आहेत तर त्यांच्या पत्नीकडे 29 लाखांचे सोने, 4 लाखांची चांदी आणि 33 लाखांचे हिरे आहेत. श्री बालाजी कॉम एलेल्पी या कंपनीत नार्वेकर यांचे 8 कोटी 31 लाखांचे समभाग आणि पत्नीचे जवळपास 6 कोटींचे समभाग आहेत.


दोन सदनिका, फार्म हाउस, शेतजमिनी

मुरुड जिल्हा रत्नागिरी येथे दोघांच्याही नावे प्रत्येकी 74.80 एकर शेतजमीन आहे जिचे आजचे मुल्य 9 लाख 23 हजार प्रत्येकी इतके आहे. बीड जिल्ह्यात देखील देखील दोघांच्याही नावे प्रत्येकी 0.19 एकर जमीन आहे जिचे आजचे मूल्य 3 लाख रुपये प्रत्येकी इतके आहे. कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात नार्वेकरांच्या पत्नीच्या नावे 2 हजार चौरस फुटांचा बिनशेती भूखंड आहे ज्याची किंमत 22 लाख रुपये इतकी आहे. नार्वेकर यांनी स्वतःच्य नावे मालाड येथे दाखवलेल्या गाळ्याची किंमत 1 कोटी 75 लाख, पवई येथे दाखवलेल्या सदनिकेची किंमत 81 लाख आणि मालाड येथे दाखवलेल्या दुसर्या सदनिकेची किंमत 61 लाख रुपये दाखवली आहे तर पत्नीच्या नावे अलिबाग येथे 3 कोटी 55 लाखांचे फार्म हाउस, झीराड अलिबाग येथे 3 कोटींची स्थावर मालमत्ता मालाड येथे 78 लाखांची सदनिका दाखवली आहे.


शिक्षण दहावी पास, एकही गुन्हा नाही

मिलिंद नार्वेकर यांचे शिक्षण दहावी पास इतके आहे. सामान्यपणे शिवसैनिकावर आंदोलनाचे गुन्हे असतात आणि शिवसैनिक ते अभिमानाने मिरवतात. प्रत्येक शिवसैनिकाच्या भाषणात स्वतःवरील गुन्ह्यांचा उल्लेख असतो. गम्मत म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. 2018-19 साली मिलिंद नार्वेकर यांचे वार्षिक उत्पन्न 55 लाख इतके होते ते 2022- 23 या आर्थिक वर्षात 1 कोटी 3 लाख रुपये इतके झाले तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 2018-19 साली 81 लाख रु इतके होते ते 2022-23 साली 6 कोटी 35 लाख इतके दाखवण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+