Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'शिवसेना झिंदाबाद, धनुष्यबाण झिंदाबाद ! एक आग एकनाथ एकनाथ'; शिवसेनेचे नवीन गाणं रिलीज

ShivSena release new party song, Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आज नवीन गाणं रिलीज झालं आहे. शिवसेनेच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन हे नवीन प्रसारित करण्यात आले. या गाण्यातील गायकाचा ठसकेबाज आवाज अन् गाण्यातील बोल प्रत्येकाच्या मनावर हे गाणं अधिराज्य गाजणवार हे मात्र नक्की. "शिवसेना झिंदाबाद, धनुष्यबाण झिंदाबाद...एक आग एकनाथ एकनाथ एकनाथ" या गाण्यातील शब्दांनी शिवसैनिकांना ताकद मिळणार आहे.

कर्तृत्ववान सातत्याने लोकांसाठी झटणारे मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काम पुढे नेले. तर आता ते शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. आपल्या कार्यकर्तृत्वातून व कृतीतून त्यांनी केलेल्या कामांचा आढावा या गाण्यात दाखवण्यात आला आहे. 3 मिनिट 23 सेंकदांच्या गाण्यातून एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्या कार्याचा आढावा यात घेण्यात आलेला आहे. विशेष करुन मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा असो की समाजातील सर्व घटकांसाठी करण्यात आलेले काम असो या सर्व बाबींची झलक शिवसेनेच्या नव्या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

ShivSena release new party song

बाळासाहेब, धर्मवीर दिघे यांच्यांशी शिंदेंचे नाते!

कृतीशील एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावा या गाण्यातून घेण्यात आला आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचे नाते या गाण्यातून दाखविण्यात आले आहे. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबतचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असलेले नाते. बाळासाहेबांचे एकनाथ शिंदे यांच्यावर असलेले प्रेम याची झलक या गाण्यातून दिसून येत आहे.

विविध योजनांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार

शेतकरी सन्मान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजना, वैद्यकीय मदत, महिला सक्षमीकरण, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख या गाण्यातून पाहायला मिळतो. विविध योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले मेहनत व गोरगरीबांना मिळवून दिलेले न्याय हा गाण्यातून दाखविण्यात आलेला आहे.

'शिवसैनिकांचा प्रेरणास्त्रोत म्हणजे एकनाथ'

जेव्हापासून शिवसेनेची कमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती आली. तेव्हापासून शिवसेचेने स्वतंत्र असे गाणे नव्हते. रात्रंदिवस झटणाऱ्या नेतृत्वाच्या कार्याचा उल्लेख करणारे आणि शिवसैनिकांना प्रेरणा देणारे गाणं अखेर रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातून शिवसेना अभिमानाने "धनुष्यबाण झिंदाबाद, शिवसेना झिंदाबाद" असे गाण्याचे बोल ठेवण्यात आले. महाराष्ट्रवासियांच्या मनामनात गुंजणारे हे गाणं आहे. हे शक्तीशाली गाणं शिवसैनिकांचे प्रेरणास्त्रोत बनले आहे. कारण त्यांच्या नेत्याचा कार्याचा उल्लेख त्यात घेण्यात आला आहे. शिवसेनेचे लोकांसाठी केलेली वचनबद्धता आणि त्याची पूर्तता या गाण्यातून पाहायला मिळत आहे. सेवाभाव, समाजकारण, सर्व वर्गातील लोकांसाठी आधारस्थान व प्रेरणा देणारं हे गाणं बनलं आहे. हे गाणं म्हणजे कृतीशील व समृद्ध राज्याची आठवण करून देणारं गाणं आहे.

निवडणूक आयोगाकडून मान्यता

शिवसेनेच्या गाण्याची निर्मिती करण्यापूर्वी सदर गाण्याचे बोल व व्हिज्युअलची माहिती सर्वात आधी निवडणूक आयोगाकडे देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर हे गाणं शिवसेनेच्या सर्व सोशल मिडिया प्लॅटफार्मवर रिलीज करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळू लागला आहे. शिवसैनिकांकडून गाण्याचं स्वागत केले जात आहे.

शिवसेनेचे संपूर्ण गाणं, वाचा- गाण्यातील बोलं...!

शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना
शिवसेना शिवसेना रारारा...
एकनाथ एकनाथ एकनाथ एक आग
एकनाथ एकनाथ एकनाथ
एक आग एकनाथ एकनाथ एकनाथ
एक आग एकनाथ एकनाथ एकनाथ
एक आग ए वाघाची जात त्याची,
तो निखारा धगधगता ए वाघाची जात त्याची,
गरीबांचा विघ्नहर्ता वाघाची जात त्याची,
तो निखारा धगधगता ए वाघाची जात त्याची,
गरीबांचा विघ्नहर्ता मर्म माझं कर्म म्हणे कार्यकर्ता
माझी जात जागवतो गाजवतो एकच एकच हा एकनाथ ए...
गर्जतो मावळा आभाळा ऐक नाद ठायीं ठायीं
घोष एक शिवसेना जिंदाबाद गर्जतो
मावळा आभाळा ऐक नाद ठायीं ठायीं घोष
एक शिवसेना जिंदाबाद धनुष्यबाण जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद

हां हां हां..

लाडकी बहिण माझी, लाडका युवा सगळ्यांपुढे आपला,
शेतकरी हवा आनंदी महिला ज्येष्ठांना खूप लाभ
उच्च शिक्षणाला आता संपूर्ण फी माफ
एकनाथ एकनाथ एकनाथ एक आग
एकनाथ एकनाथ एकनाथ एक आग
एकनाथ एकनाथ एकनाथ एक आग
एकनाथ एकनाथ एकनाथ एक आग
शिवबाचा भक्त राखे शिवबाचे तख्त
भगवाच झेंडा अन भगवंच रक्त
जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ
जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ
जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ
जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ
गर्जतो मावळा आभाळा ऐक नाद
ठायी ठायीं घोष एक शिवसेना जिंदाबाद
गर्जतो मावळा आभाळा ऐक नाद
ठायीं ठायीं घोष एक शिवसेना जिंदाबाद धनुष्यबाण जिंदाबाद,
शिवसेना जिंदाबाद धनुष्यबाण जिंदाबाद,
शिवसेना जिंदाबाद धनुष्यबाण जिंदाबाद,
शिवसेना जिंदाबाद धनुष्यबाण जिंदाबाद,
जिंदाबाद, जिंदाबाद....!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+