Shivsena : शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप, भाजपने घेतला आक्षेप
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरखे वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमावर विरोधकाकंडून कडाडून टीका करण्यात आली. आता महायुतीतील मुख्य मित्र पक्ष भाजपाने देखील या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. हा कार्यक्रम त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. भाजप अशा कार्यक्रमाशी सहमत नाही, अशी भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली आहे.
यामिनी जाधव यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात आपली छाप कायम ठेवण्यासाठी भायखळा मतदारसंघातील विद्यमान आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा बॅनर चर्चेचा कारण ठरला होता. या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप घेतला आहे.

संजय राऊत यांनीही केली होती टीका
मुस्लिम मतांवर डोळा ठेवून बुरखा वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. यावरून विरोधकांनी टीका केली होती. बुरखा वितरणाचा बॅनर भायखळा येथे लावण्यात आला होता. हा बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.. हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम केले जात असल्याची टीका विरोधकांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कार्यकर्ते मुलींना शाळेत बुरखा घालण्यापासून रोखत असताना, येथे बुरखादान केले जात आहे. हा ढोंगीपणा आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
यामिनी जाधव यांनी दिले स्पष्टिकरण
विरोधकांकडूनहोत असलेली टीका आणि मुख्य सहयोगी पक्ष भाजपची भूमिका स्पष्ट झा्ल्यानंतर यामिनी जाधव यांनी स्पष्टिकरण दिले आहे, त्या म्हणाल्या की, माझी विधानसभा कॉसमोपॉलिटन आहे. इथे सर्वधर्माचे लोक राहतात. लोकप्रतिनिधीनं त्याच्या विभागातल्या लोकांना त्यांचा धर्म न पाहता काय हवं याचा विचार करायला हवा. लोकप्रतिनिधीनं स्वत:चा धर्म पुढे न करता माझ्या लोकांना काय हवं, याचा विचार करायला हवा.
दिवाळीत आपण त्यांना भेटवस्तू देतो. मग त्या बहिणींना भेटवस्तू जाते आणि मुस्लीम भगिनींना काहीच भेट दिली जात नाही.म्हणून हा बुरखावाटप केला आहे. मुस्लीम महिलांना नेहमी वापरात असणारी आणि जास्तीत जास्त प्रिय असणारी गोष्ट म्हणजे बुरखा आहे. तो त्यांचा सन्मान आहे. असे यामिनी जाधव यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications