माझ्या मृत्यूस शिवसेना नेत्याचा भाऊ जबाबदार; इंस्टावर व्हिडिओ शेअर करुन युवकाची आत्महत्या
Suicide News : मालामधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिवाळीच्या काळात या घटनेने अनेकांच्या हृदयाचा थरकार उडवला तर राजकीय नेत्यांच्या गटात देखील चर्चा होऊ लागली आहे. एका युवकाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत माझ्या मृत्यूस एका बड्या राजकीय नेत्याचा भाऊ असल्याचे सांगून जीवनयात्रा संपवली. त्यामुळे या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली.
नेमका काय घडलाय प्रकार?
राजधानी मुंबईमधील मालाडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या दोन दिवस अगोदरच एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर रिल्स टाकून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रेश तिवारी असं या जीवन संपवलेल्या व्यक्तीचं नाव आहे. विशेष म्हणजे चंद्रशे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टावर व्हिडिओ पोस्ट केला. त्यात आत्महत्येस शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बंधुचं नाव घेतलंय. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तपास केला जात आहे.

सदानंद कदमसह दोघांवर गुन्हा दाखल
चंद्रेश तिवारी यांनी व्हिडिओतून कदम यांचं नाव घेत पोस्ट केली. पोस्टमध्ये आत्महत्येस रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यासह आणखी दोघांची नावे घेत त्यांना जबाबदार ठरविण्यात आलं. सदानंद कदम यांनी मुंबईत इतर कोणत्याही कंपनीत काम करू देणार नाही, असा इशारा चंद्रेश याला दिला होता.
याप्रकरणी, चंद्रेशचा भाऊ पावन तिवारी यांनी कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सदानंद कदम यांच्यासह धमकी देणाऱ्या आणखी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications