Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NCP-शिवसेनेत जुंपली; आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंवर आरोप; परांजपेंना म्हणाले तू दीडदमडीचा माणूस...

Eknath Shinde vs Ajit Pawar : महाड या ठिकाणी मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत गंभीर आरोप लावले.

त्यानंतर राष्ट्रवादीकडून देखील दोन्ही आमदारांना प्रत्युत्तर देण्यात आले. त्यावर आता महेंद्र दळवी यांनी पुन्हा अजित पवारांच्या पक्षाची फार लाज काढली. तर तटकरेंनी अनेकांना फसवलं आहे, असा गंभीर आरोप केला.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांचा खरपूस समाचार घेतला. महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांना त्यांना मुघलांची उपमा दिली. त्यावर देखील आमदार महेंद्र दळवी यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, हा परांजपे कोण आहे, दीडदमडीचा माणूस. सुनील तटकरे यांनी पाळलेले हे प्राणी आहेत. दुसऱ्या प्रवक्त्याने सुद्धा हे असे वक्तव्य करू नये. कारण सुनिल तटकरे यांना सुद्धा आमचा पूर्व इतिहास माहीत आहे, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांना दिलाय.

MLA Mahendra Dalvi and Mahendra Thorve

तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ

सुनिल तटकरे यांना आम्ही निवडून दिले आणि त्यांनी आम्हालाच पाडण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप देखील महेंद्र दळवी यांनी केला. परांजपे यांनी 2029 ला सुनिल तटकरेच लोकसभेला निवडून येतील, असे वक्तव्य केले. विधानावर दळवी म्हणाले की, तटकरे यांनी आत्ताच राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान दिले आहे. सुनील तटकरे यापुढे निवडून आले तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ.

काय म्हणाले होते आनंद परांजपे?

राष्ट्रवादी मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटलं होतं की, काल पुन्हा एकदा मुघलांच्या वंशाजांनी गरळ ओकली. 2029 साली सुनील तटकरे हेच लोकसभेत विजय होतील. ज्या रूमालाचा आपण उल्लेख केला. त्याच रुमालाने आपला चेहरा लपवून पुढील आयुष्य जगावे लागणार नाही ना? ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल. शिवसेनेचे मंत्री असतील, दोन्ही आमदार असतील, हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात, असेही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+