मोठी बातमी : शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, 45 जणांचा समावेश, वाचा- कोणाला कुठून मिळाली संधी
Shinde Sena releases list of 45 candidates for Maharashtra Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वतीने 45 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. बहुतांश विद्यमान आमदारांचा यात समावेश आहे.

वाचा संपूर्ण यादी....! कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाले तिकीट...!
जय महाराष्ट्र
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2024
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc… pic.twitter.com/0rBkOkMTMU
मतदारसंघ व उमेदवारांची नावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.
साक्री (अज) विधानसभा मतादरसंघातून श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित
चोपड्यातून चंद्रकांत बळवंत सोनावणे
जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील
एरंडोलमधून अमोल पाटील
पाचोऱ्यातून किशोर पाटील
मुक्ताईनगरमधून चंद्रकांत निंबा पाटील
बुलढाण्यातून संजय गायकवाड
मेहकरमधून डॉ. संजय रायमुलकर
दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अभिजीत अडसूळ
रामटेक मतदारसंघातून आशिष जैस्वाल
भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर
दिग्रसमधून संजय राठोड
नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर
कळमनुरीमधून संतोष बांगर
जालन्यातून अर्जून पंडितराव खोतकर
सिल्लोडमधून अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजी नगरमधून प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजी नगर (पश्चिम) मतदारसंघातून संजय शिरसाट
पैठणमधून विलास भूमरे
वैजापूरमधून रमेश बोरनारे
नांदगावमधून सुहास कांदे
मालेगावमधून दादाजी भुसे
ओवळा माजीवडा मतदारसंघातून प्रताप बाबूराव सरनाईक
मागाठाणेमधून प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी पूर्वमधून मनिषा वायकर
चांदिवली मतदारसंघातून दिलीप लांडे
कुर्ला मतदारसंघातून मंगेश अनंत कुडाळकर
माहीमधून सदा सरवणकर
भायखळ्यातून यामिनी जाधव
कर्जतमधून महेंद्र थोरवे
अलिबाग मतदारसंघातून - महेंद्र दळवी
महाडमधून भरतशेठ गोगावले
उमरगामधून ज्ञानराज चौगुले
परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत
सांगोल्यातून शहाजी पाटील
कोरेगावमधून महेश शिंदे
पाटणमधून शंभूराज देसाई
दापोलीतून योगेश कदम
रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत
राजापूर मतदारसंघातून किरण सामंत
सावंतवाडीतून दीपक केसरकर
राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आबिटकर
करविर मतदारसंघातून चंद्रदीप नरके
खानापूर मतदारसंघातून सुहास बाबर
एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडीतून मैदानात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधील घटक पक्ष असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
मंत्री उदय सामंतांसह त्यांच्या भावाचा समावेश
शिंदेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीमधून मंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर दापोलीमधून योगेश कदमांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेली नाही.
भाजपनेही 99 उमेदवारांची यादी केली जाहीर
महायुतीमधील भाजप पक्षाने देखील त्यांची पहिली यादी जाहीर केली होती.तसेच अजित पवारांनी देखील काही उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तर अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देखील वाटप केले. त्यामुळे आता जागावाटपावरील मतभेद मिटल्याचे दिसून येत आहे.
काही जागांवर महायुतीमध्ये मतभेद होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागा त्याग करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपने दावा सांगितला आहे.
माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्द सदा सरवणकर
माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे पक्षाकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे, तर याच विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माहीम येथे शिंदे गटाच्या विरोधात मनसे असा सामना रंगणार आहे.












Click it and Unblock the Notifications