Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिवाजीराव कर्डिले यांची अचानक एक्झिट! काल पंडीत प्रदीप मिश्रांची भेट अन् आज निधनाच्या बातमीने धक्का!

Shivajirao Kardile Passes Away : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले (वय ६७) यांचे आज, शुक्रवारी १७ ऑक्टोबर २०२५ पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे काल दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय असलेले कर्डिले यांचे आज सकाळी निधनाचे वृत्त धडकले अन् राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

Shivajirao Kardile Passes Away

काल पं. प्रदीप मिश्रांची भेट, आज एक्झिट

आमदार कर्डिले यांनी आपल्या निधनाच्या आदल्याच दिवशी, म्हणजेच गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी अध्यात्मिक गुरु पंडीत प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली होती. पंडीत प्रदीप मिश्रा हे सध्या पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थान परिसरात आयोजित शिवमहापुराण कथेनिमित्त जिल्ह्यात उपस्थित आहेत. डॉ. विखे पाटील यांच्या निवासस्थानी कर्डिले यांनी पंडित मिश्रा यांची भेट घेतली. ही भेट जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.

Shivajirao Kardile Passes Away

कार्यकर्ते, आप्तेष्ठांवर मोठा आघात

काल सकाळी उत्साहाने भेट घेऊन चर्चा करणारे नेते आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावले, या बातमीने त्यांच्या कुटुंबीयांसह, समर्थक आणि कार्यकर्त्यांवर मोठा आघात झाला आहे. पहाटे त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.

सामान्य दुध विक्रेता ते आमदार

सामान्य दूध व्यवसाय ते आमदार आणि राज्यमंत्री असा कर्डिले यांचा संघर्षमय राजकीय प्रवास प्रेरणादायी ठरला. सहा वेळा आमदारकी भूषवलेल्या या 'किंगमेकर' नेत्याच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

कर्डीले यांचे हृदविकाराने निधन

माजी मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्यातील दादा व्यक्तिमत्व शिवाजी कर्डीले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. आज पहाटे त्रास जाणवू लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, त्यांचे निधन झाले.

शिवाजी कर्डिले यांची राजकीय कारकीर्द

  • मूळात दुग्धव्यवसाय करणारे कर्डिले यांनी स्थानिक राजकारणातून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि अल्पावधीतच ते मोठे नेते बनले.
  • कर्डीले यांनी राहुरी मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले. २००९ आणि २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून (BJP) तिकीट मिळाल्यावर ते आमदार म्हणून निवडून आले होते.
  • कर्डीले यांनी राहुरीसह नगर-नेवासा मतदारसंघातूनही विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. एकूण त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती.
  • माजी मंत्री आणि अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
  • आमदार कर्डिले यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकारणातील एक मोठे आणि वादळी पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+