Shivaji Maharaj Statue Collapse Case : महाविकास आघाडीचं महायुती सरकारविरोधात मुंबईत आंदोलन सुरु

shivaji Maharaj Statue Collapse Case : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईत महाविकास आघाडीतर्फे आज, 'जोडे मारो' आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबईत हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया या परिसरादरम्यान सुरु असलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते सहभागी झाले आहेत.

Shivaji Maharaj Statue Collapse Case MVA s Movement on Gateway of India Latest Update

पोलिसांचा कडक बंदोबस्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन सुरु आहे.

महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ MVA (महा विकास आघाडी) ने मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा निषेध मोर्चा काढला. यादरम्यान महाविकास आघाडीतर्फे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलाही या निषेध मोर्चात सहभागी झाल्या आहेत. ते महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत.

महायुतीचाही पलटवार..

महायुतीनेही महाविकास आघाडीच्या विरोधात आज निषेध आंदोेलन पुकारलं आहे. महाविकास आघाडीनं त्यांच्या सत्ताकाळात चुकीची कामं केल्याचा आरोप करत फलक दाखवून आंदोेलन केलं जात आहे. हे मविआच्या आंदोलनाला प्रत्युत्तर आहे.

Shivaji Maharaj Statue Collapse Case MVA s Movement on Gateway of India Latest Update

हा प्रकार चोरांच्या उलट्या बोंबा..- वडेट्टीवार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे तसेच राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शांततेच्या मार्गाने 'जोडे मारो ' आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे पण याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने विरोधकानांच सद्बुद्धी देण्याचा आंदोलन चालू केला आहे, हा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडडेटीवार यांनी आज नागपूर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

तुमच्यासारखे नतदृष्ट कुणी नाही..

महाविकास आघाडी जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल आणि त्याला विरोध सत्ताधारी करत असतील तर यांच्यासारख्या नतदृष्ट कोणीच नाही अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली. या सरकारने महाराजांचा अपमान केला त्यांनी खुर्च्या खाली करायला हव्या आहेत असेही ते म्हणाले. आमच्या मोर्चाला सरकारने परवानगी दिली नाही. आमचा मोर्चा शांत आहे तरीही महायुती सरकारनं परवानगी दिली नाही. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या आंदोलनाला परवानगी नाकारत असाल तर तुमच्यासारखे नतदृष्ट कुणी नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले फडणवीस?

महाविकास आघाडीच हे आंदोलन पूर्णपणे राजकीय असून काँग्रेसनेच शिवाजी महाराजांचा अपमान इंदिरा गांधी यांच्या काळापासून केला आहे असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+