Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Shivaji maharaj death anniversary : हे खास संदेश मित्रांना पाठवा आणि शिवरायांचे विचार अंगी रुजवा!

Shivaji maharaj death anniversary 2025 quotes thoughts : छत्रपती शिवाजी महाराज भारताचे आराध्य दैवत, पराक्रमी राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक अशा एक ना अनेक बिरुदावली त्यांच्यासाठी कमीच. त्यांच्या अफाट कार्यापुढे आपली मानही नतमस्तक होते.

हिंदवी स्वराज्या स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची 3 एप्रिल 2025 रोजी पुण्यतिथी आहे. यंदा शिवरायांचा 345 वा स्मृतिदिन आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अनादी काळापर्यंत सर्वांना प्रेरित करत राहतील.त्यासाठीच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत 10 टाॅप संदेश आणि त्यांचे 5 अनमोल विचार देत आहोत.

Shivaji maharaj death anniversary 2025

1. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस..
सिहांसनाधीश्वर.. योगीराज..
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

2. राजा शिवाजी माझा, पराक्रमी, शूर-वीर
स्वराजाचा सूर्य, वंदन करीतो त्यांना, ..जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

3. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नावच नाही
आमचा स्वाभीमान, आण-बाण आणि शान.., जय शिवराय

4. चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा,
एकच होता असा राजा,
नाव त्याचं घेऊ किती म्हणतात त्याला छत्रपती!
जय शिवराय..!

5. निधड्या छातीचा, दणकट कणांचा,
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा,
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...!
जय शिवराय!

6. स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास,
रयतेचे सुख ही एकच मनी होती आस,
मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा,
असा वाघिणीचा होता तो छावा..!
...जय शिवराय!

7. "सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे,
स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे,
छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!"
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

8. "रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं,
पराक्रमाची गाथा लिहून गेला जो,
तो एकच -छत्रपती शिवराय!"

9. जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवरुन मायेने हात फिरवणारा
राजा छत्रपती होता..
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

10. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग...
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ...
शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,
शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा,
शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश!
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

छत्रपती शिवाजी महाराजांचे अनमोल विचार

1. मरण आले तरीही चालेल पण शरण जाणार नाही - छत्रपती शिवाजी महाराज की जय..

2. "जेव्हा आत्मविश्वास असतो, तेव्हा डोंगरसुद्धा धुळीच्या ढिगारासारखा वाटतो." - छत्रपती शिवाजी महाराज की जय

3. "जेव्हा ध्येय जिंकायचे असते, तेव्हा ते साध्य करण्यासाठी कितीही मेहनत घेतली, किंमत मोजावी लागते." - छत्रपती शिवाजी महाराज

4. "जो व्यक्ती काळाच्या दुष्ट वर्तुळातही पूर्ण समर्पणाने आपल्या कामात गुंतून राहते, त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलते." - छत्रपती शिवाजी महाराज

5. "शत्रू कितीही बलाढय़ असला तरी त्याचा पराभव केवळ आपल्या इच्छाशक्तीने होऊ शकतो." ~छत्रपती शिवाजी महाराज

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+