Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उबाठाचा जाहीरनामा... धारावी, मोफत शिक्षण, नोकरी अशी बरीच दिली आश्वासनं...

Uddhav Thackeray Group Manifesto : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. उद्धव ठाकरे यांनी या जाहीरनाम्याचे प्रकाशन केलं. धारीव पुर्नप्रकल्प रद्द करण्याबरोबरच इतर अनेक बाबींवर या जाहीरनाम्यात हात घालण्यात आला. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे, मात्र शिवसेनेचीही काही वचने आहेत. तीच वचने आज प्रसिद्ध करत आहोत, हे आवर्जून स्पष्ट केले.

Uddhav Thackeray Group Manifesto

काय आहे जाहीरनाम्यात

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल. कोळीवाड्याची ओळक पूसु देणार नाहीत. कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करु अशी आश्वासने देण्यात आली आहेत. शिवाय राज्यातील बेरोजगारी हटवून भुमिपूत्रांना नोकऱ्या देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही या जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. मुलांना मोफत शिक्षण देणार, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, अशी आश्वासनेही देण्यात आली आहेत.

मातोश्रीवर नेत्यांची उपस्थिती

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभेच्या दृष्टीने आज हा जाहीरनमा प्रसिद्ध करण्यात आला. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनिल परब, सुभाष देसाई यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते. लवकरच महाविकास आघाडीचा जाहीरनामाही येणार आहे. मात्र आम्ही आपल्याला काही महत्त्वाचे वचने देऊ इच्छितो, यासाठी हा जाहीरनामा असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

नोकरीला दिलं प्राधान्य

या जाहीरनाम्यात मुलांना मोफत शिक्षणाबरोबरच ठाकरे गटाने नोकरी, नोकरी आणि नोकरी ही आमची सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे असं स्पष्ट केलं. मुलींना ज्या पद्धतीने मोफत शिक्षण दिलं जातं त्याच पद्धतीने मुलांनाही मोफत शिक्षण दिलं जाईल, असं उबाठानं आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं. शिक्षणानंतर मुलांच्या नोकरीसाठीही उबाठा कटीबद्ध आहे. असं जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+