Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'प्रणिती शिंदे मतदारसंघात फिरून तर दाखवा, तुमच्या बापालाही घाबरत..' ठाकरेंचा शिलेदार भडकला, वाद काय?

सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. महाविकास आघाडीमध्ये सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये बिघाडी झाल्याचे सकाळी दिसून आले. तर आता मतदान संपल्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक संतापले . त्यांनी खा. प्रणिती शिंदेंना मतदारसंघात फिरून तर दाखवा, असा इशारा दिला.

तर आता मतदान संपताच सोलापूर शहर दक्षिणमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आक्रमक झालेत. कारण प्रणिती शिंदे यांनी शेवटच्या दिवशी डाव पलटला. व ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान न करता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसैनिक संतापले. त्यांनी शिंदे-पिता-पुत्रीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत संताप व्यक्त केला.

Sharad Koli attack on Praniti Shinde

नेमका काय वाद, आज काय घडलंय?

जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलेली होती. शिवसेनेनं इथे अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचा या जागेवर दावा होता मात्र, त्यांना ही जागा मिळाली नव्हती. अखेरच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले. मतदान पार पडल्यानंतर शिवसैनिकांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं.

शिवसैनिक संतापले, एकेरी भाषेत उल्लेख

सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर शहर दक्षिण मध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटलांऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. या मुद्यावरुन शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.

शरद कोळी संतापले, कॉंग्रेसला ठेचण्याची मागणी

लोकसभेवेळी प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी बूट चाटण्याचे काम केलं, अशी टीका शरद कोळी यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवाल्यांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे, अशी विनंती करत असल्याचं शरद कोळी म्हणाले. प्रणिती शिंदे तुम्हालाच काय, तुमच्या बापाला देखील आम्ही भीत नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केला.

सोलापूर शहर दक्षिणमध्ये कुणामध्ये लढत?

सोलापूर शहर दक्षिण महायुतीतीत भाजपकडे आहे. भाजपनं या मतदारसंघातून माजी मंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे. तर, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी अमर पाटील यांच्या प्रचारासाठी सभा देखील घेतली होती. तर, धर्मराजा काडादी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस या जागेसाठी प्रयत्नशील होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+