Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिवसेना जिल्हाप्रमुखांवर गोळीबार, अमरावतीत थरार; वाचा, काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग

Amravati Crime News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे अमरावतीचे जिल्हाप्रमुख गोळीबाराच्या घटनेतून बालंबाल बचावले आहेत. जिल्हाप्रमुख गोपाल अरबट हे कारमधून जात असताना त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला, गोळी काचेवर जाऊन लागली. त्यानंतर गोपाल अरबट यांनी कारचा वेग वाढवला. तरी देखील त्यांचा पाठलाग केला जात होता. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी धाव घेतल्याने अरबट यांचे प्राण वाचले.

शिवसेना जिल्हाप्रमुखावर गोळीबार, काय घडले? गोपाल अरबट यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमरावतीतील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये वाद असून, त्यातून अरबट यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे...!

Shivsena

कसा घडला प्रसंग, वाचा सविस्तर!

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती-दर्यापूर मार्गावरील पाटील ढाब्यासमोर सोमवारी मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. तक्रारीतील माहितीनुसार, गोपाल अरबट हे अमरावतीमधील कामं आटोपून इनोव्हा कारने दर्यापूरला जात होते.

चांगापूर फाट्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ गाडी आली. त्या गाडीतून उतरलेल्या तीन-चार जणांनी अरबट यांची गाडी थांबवली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर गोपाल अरबट पुढे निघून गेले. ते पाटील ढाब्यापर्यंत आले.

तिथे त्यांना काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसली. ते तीन-चार जण गाडी थांबवण्याचा इशारा करत होते. पण, अरबट यांना एका व्यक्तीच्या हातात पिस्तूल दिसले.

कारच्या काचेवर लागली गोळी अरबट बघत असतानाच एकाने गोळी झाडली. ती त्यांच्या गाडीच्या काचेवर जाऊन लागली. अरबट घाबरले. त्यांनी वेगाने गाडी दर्यापूरच्या दिशेने पळवली. गाडी चालवत असतानाच त्यांनी पोलिसांना फोन केला.

त्यावेळी दोन गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या. मग त्यांनी आसेगाव टी पॉईंटवरून गाडी खल्लार शिंगणापूर मार्गावर आणली. त्यावेळी समोरून पोलीस येत होते. त्यामुळे अरबट हे थोडक्यात हल्लेखोरांच्या तावडीतून सुटले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+